no images were found
अदाणी एअरपोर्ट्सने 360 वन ऍसेट कडून सुमारे ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवीन इक्विटी भांडवल उभारले
नवीन गुंतवणुकीमुळे अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडची एकूण भांडवल उभारणी सुमारे १.३५ अब्ज अमेरिकी डॉलरवर
अहमदाबाद,:अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडची (एईएल) उपकंपनी आणि भारतातील मोठ्या खासगी विमानतळ कंपन्यांपैकी एक असलेल्या अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने (एएएचएल ) 360 वन अल्टरनेट्स ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेड सोबत करार केला आहे. या कंपनीच्या फंड्स आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून एएएचएल मध्ये २,७९० कोटी रुपये (सुमारे ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलर) गुंतवले जाणार आहेत. या नवीन गुंतवणुकीमुळे आतापर्यंत एएएचएल ने उभारलेल्या एकूण इक्विटी भांडवलाचा आकडा सुमारे १.३५ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे.
यापूर्वी अल्फा वेव्ह ग्लोबल, प्रेमजी इन्व्हेस्ट, टेमासेक आणि ब्लॅकरॉक द्वारे व्यवस्थापित फंडांच्या समूहाने एएएचएल मध्ये ९,८२५ कोटी रुपये (सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलर) गुंतवण्याचा करार केला होता. भारतातील विमानतळ पायाभूत सुविधा क्षेत्रात वित्तीय संस्थांकडून करण्यात आलेल्या मोठ्या गुंतवणुकींपैकी ही एक महत्त्वाची गुंतवणूक होती.
एएएचएल आणि 360 वन ऍसेट यांच्यात शेअर सबस्क्रिप्शन करार झाला आहे. यानुसार 360 वन ऍसेट कंपनी एएएचएल चे नवीन इक्विटी शेअर्स आधीच्या गुंतवणूकदारांप्रमाणेच अटी आणि मूल्यांकनानुसार खरेदी करणार आहे. यामध्ये कंपनीचे गुंतवणुकीपूर्वीचे मूल्यांकन सुमारे १८ अब्ज अमेरिकी डॉलर निश्चित करण्यात आले आहे. 360 वन ऍसेट ने आधीच्या गुंतवणूकदारांसोबत झालेल्या शेअरहोल्डर्स करारालाही मान्यता दिली आहे. हे दोन्ही व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सर्व गुंतवणूकदारांकडे मिळून एएएचएल मधील सुमारे ७.०१ टक्के हिस्सा असेल. या व्यवहारासाठी आवश्यक परवानग्यांसह इतर नियमित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक जीत अदाणी म्हणाले, “अदाणी एअरपोर्ट्सच्या विकासाच्या दिशेने ही आणखी एक महत्त्वाची पायरी आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्या नामांकित गुंतवणूकदारांनी आमच्यासोबत येणे, हे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील वाढीवर त्यांचा विश्वास दर्शवते. विमानतळांचा विकास केवळ प्रवाशांच्या येण्या-जाण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यांना विमान वाहतूक, व्यापार, मनोरंजन आणि प्रादेशिक मालवाहतूक यांना एकत्र आणणाऱ्या आधुनिक एअरपोर्ट सिटीजमध्ये बदलण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशाच्या विकासाला दीर्घकाळ मदत होईल.”
360 वन ऍसेट सोबतची ही नवीन गुंतवणूक अल्फा वेव्ह ग्लोबल, प्रेमजी इन्व्हेस्ट, टेमासेक आणि ब्लॅकरॉक द्वारे व्यवस्थापित फंडांच्या आधीच्या गुंतवणुकीला जोडणारी आहे. या गुंतवणुकीतून एएएचएल ची मोठी व्याप्ती, कामकाजाची क्षमता आणि भविष्यातील विकासाच्या संधींवर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
या विविध टप्प्यांमध्ये उभारलेल्या भांडवलाचा उपयोग कंपनीच्या विमान वाहतूक आणि पायाभूत सुविधा व्यवसायाच्या भविष्यातील विकासासाठी तीन प्रमुख उद्दिष्टांवर केला जाणार आहे. सध्या कंपनी दरवर्षी सुमारे ९.६ कोटी प्रवाशांची हाताळणी करते. भविष्यात ही क्षमता दुप्पट करून दरवर्षी २० कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
एएएचएल ने आपल्या संपूर्ण विमानतळ नेटवर्कमध्ये आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्याचा मोठा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक ठिकाणी आधुनिक सुविधा असलेल्या अदाणी एअरपोर्ट सिटीज विकसित केल्या जाणार आहेत. तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक चांगल्या करण्यासोबतच विमानतळांवरील रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि इतर बिगर-विमान वाहतूक व्यवसायांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे व्यावसायिक उत्पन्न वाढण्यास आणि प्रवाशांचा विमानतळावरील अनुभव अधिक चांगला होण्यास मदत होईल. पायाभूत सुविधा, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी सेवा यांचा एकत्रित विकास करून अदाणी समूहाची विमानतळ व्यवसायाशी संबंधित संपूर्ण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.