Home Uncategorized लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाह वाहिनीने पूर्ण केली विश्वासाची १८ वर्ष

लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाह वाहिनीने पूर्ण केली विश्वासाची १८ वर्ष

6 second read
0
0
13

no images were found

लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाह वाहिनीने पूर्ण केली विश्वासाची १८ वर्ष

       काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. स्टार प्रवाहचा १८ वर्षांचा प्रवास हा असाच प्रेमाचा, विश्वासाचा, आणि अभिमानाचा आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या स्टार प्रवाहने गेल्या १८ वर्षांत मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची अभिरुची, मनोरंजनाची माध्यमं आणि आशय बदलत असताना स्टार प्रवाहने मात्र प्रेक्षकांशी जोडलेलं आपुलकीचं नातं कायम जपलं आहे.

          या प्रवासात अनेक लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचल्या. कधी हसवलं, कधी रडवलं, कधी नात्यांची नवी परिभाषा शिकवली, तर कधी सामाजिक विषयांना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे हात घातला. प्रत्येक मालिकेने, प्रत्येक कथेने आणि प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मराठी संस्कृती, परंपरा आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम घडवत वाहिनीने आपल्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या मातीतली नाळ कायम जपली.

या १८ वर्षांच्या यशस्वी वाटचालीमागे कलाकारांसोबतच लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, पडद्यामागील संपूर्ण टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाहवर भरभरून प्रेम करणारे लाखो प्रेक्षक या प्रत्येकाचं योगदान मोलाचं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच स्टार प्रवाह वाहिनीचा यापुढील प्रवास अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे कोल्हापूर,  : महिल…