
no images were found
सामाजिक न्याय विभागामार्फत गुरुवारी स्टँडअप योजना कार्यशाळा
कोल्हापूर : सेवा पंधरवडा धर्तीवर सामाजिक न्याय विभागाकडून दिनांक २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये कर्तव्यपथ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये स्टँड अप इंडिया योजनेसाठी प्रस्ताव प्राप्त करुन घेवून त्यांना मंजुरी देण्याच्या दृष्टीने गुरुवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सहायक आयुक्त समाज कल्याण, कार्यालय, कोल्हापूर येथील सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेस लिड पैक इतर राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित असणान्या नव उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योगांनी सदर कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे अवाहन प्रभारी सहायक आयुक्त सचिन साळे, यांनी केले.
केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये स्टैंड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. सदर योजनेचा लाभ घेवून प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसूचित जातीय योद्ध समाजातील उद्योजकांना १5 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती साठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्या नंतर व बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया या योजनेअंतर्गत ७5 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत मार्जिन मनी १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल, असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद आहे.