
no images were found
प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या
कोल्हापूर : गिरोली घाटातील पांडवलेणी येथे प्रेयसीचा खून करून प्रियकराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली. प्रेयसी ऋतुजा चोपडे (वय २१) हिने प्रियकर कैलास पाटील यास लग्नास नकार दिल्याच्या रागात हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून आज सकाळी उपचार दरम्यान प्रियकराचा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.
प्रियकर कैलास पाटील (कागल ता. लिंगनूर) याने प्रेयसी ऋतुजा चोपडे (हातकणंगले ता. खोतवाडी) हिला तीन वर्षापूर्वी कैलासने लग्नासाठी विचारले होते. ऋतुजाच्या आई – वडिलांनी त्यावेळी लग्नास होकार दिला होता. परंतु आरोपी कैलास काही कामधंदा करत नसल्याने तसेच ऋतुजा आणि कैलासमध्ये १० ते १२ वर्षे वयाचा फरक असल्याने १ वर्षापूर्वी आई – वडिलांनी त्यांच्या लग्नास नकार दिला होता. याचा राग मनात धरून प्रियकर कैलासने गिरोली घाटातील पांडवलेणी येथे ऋतुजाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्याही नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काल सीपीआरमध्ये कैलासवर उपचार सुरु होते परंतु आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची फिर्याद ऋतुजाचे वडील प्रकाश चोपडे यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.