
no images were found
कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण
स्टार प्रवाहवर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत. मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुलींना स्वरक्षण हे यायलाच हवं आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं या मताची असणारी कावेरी गावातल्या इतर मुलींनाही स्वरक्षणाचे धडे देते. या भूमिकेसाठी गिरीजा जवळपास महिन्याभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतेय. काठी कशी पकडायीच इथपासून सुरु झालेला गिरीजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करुन स्वरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
गिरीजाला नृत्यकला उत्तमरित्या अवगत आहेच. या मालिकेच्या निमित्ताने गिरीजा लाठीकाठीही शिकली. या अनुभवाविषयी सांगताना गिरीजा म्हणाली, ‘लाठीकाठी हा महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे. स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारिरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. लाठीकाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्यासोबत राहिल. ही कला प्रत्येकाने शिकायला हवी असं यानिमित्ताने मी आवाहन करेन. मी अवगत केलेली ही कला मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तेव्हा नक्की पाहा माझी नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू २८ एप्रिलपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.