Home शासकीय घाऊक व किरकोळ व्यापारी, प्रोसेसर्सकरीता गव्हाच्या साठयावर निर्बंध लागू

घाऊक व किरकोळ व्यापारी, प्रोसेसर्सकरीता गव्हाच्या साठयावर निर्बंध लागू

39 second read
0
0
42

no images were found

घाऊक व किरकोळ व्यापारी, प्रोसेसर्सकरीता गव्हाच्या साठयावर निर्बंध लागू

 

            कोल्हापूर  :  घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच प्रोसेसर्सकरीता गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध दि. 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी कळविले आहे.

            गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध याप्रमाणे- घाऊक व्यापारी 3 हजारमेट्रीक टन. किरकोळ व्यापारी प्रत्येक किरकोळ आउटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3 हजार टन. बिन चेन रिटेलर्स :- प्रत्येक आउटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3 हजार टन. प्रोसेसर्स- वार्षिक स्थापित क्षमतेच्या 75 टक्के किंवा मासिक स्थापित क्षमता गुणिले सन 2023-24 चे उर्वरित महिने यापैकी जे कमी असेल ते.

            कायदेशीर घटकांकडे असणारा गव्हाचा साठा दि. 12 जून, 2023 च्या अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास. तसे https//evegoils.nic.in/wsp/login या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. अधिसूचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठयाच्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक राहील. तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितपणे प्रसिध्द करणे आवश्यक आहे.

            आदेशाची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गव्हाचा साठा निर्बंध दि 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहेत या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…