no images were found
१० ऑक्टोबरपासून सकाळच्या सत्रात कोल्हापूर-कलबुर्गी गाडीस प्रारंभ !
कोल्हापूर – मध्य रेल्वेच्या सल्लागार समिती सदस्य, रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन आणि रेल्वे कृती समिती सांगली-मिरज यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत १० ऑक्टोबरपासून कोल्हापूर-कलबुर्गी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी १५ नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता प्रतिदिन धावणार आहे. कोल्हापूर येथून ही गाडी सकाळी ६.१० वाजता सुटेल. मिरज येथे सकाळी ७.३० वाजता आगमन होऊनकलबुर्गी येथे दुपारी ४.१० वाजता पोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सायंकाळी ६.१० वाजता कलबुर्गी येथून निघून कोल्हापूर येथे पहाटे ५.४० ला पोचेल.
याचसमवेत १५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई साप्ताहिक विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री १२.०५ वाजता कोल्हापूर येथून निघेल आणि दुपारी १.३० वाजता मुंबई येथे पोचेल. परतीच्या प्रवासात ही प्रत्येक गुरुवारी दुपारी २.३० वाजता मुंबई येथून सुटेल. त्यानंतर पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज मार्गे ही गाडी शुक्रवारी पहाटे ४.२० वाजता कोल्हापूरला पोचेल. दसरा, दिवाळी अशा सणांच्या पार्श्वभूमीवर चालू होणार्या या दोन्ही गाड्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे, तसेच पंढरपूर येथे जाणार्या वारकर्यांचीही चांगली सोय होणार आहे.
मध्यरेल्वे मुंबई प्रादेशिक सल्लागार समिती सदस्य श्री. किशोर भोरावत, श्री. सुकुमार पाटील, तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंडितराव(तात्या) कराडे, ज्ञानेश्वर पोतदार, सोपान भोरावत यांसह अन्य सदस्यांनी याचा पाठपुरावा केला.