Home आरोग्य स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत ऐतिहासिक टप्‍पा

स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत ऐतिहासिक टप्‍पा

3 second read
0
0
5

no images were found

स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत ऐतिहासिक टप्‍पा

गोवा: स्तनाचा कर्करोग ही भारतातील महिलांमध्ये सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या ठरत असताना, गोवा राज्य स्तनाच्या कर्करोगाची तपासणी रुग्णालयांच्या पलीकडे नेऊन थेट समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत आहे. एसबीआय फाऊंडेशन आणि युवराज सिंग फाऊंडेशनच्या (यूवीकॅन) सहयोगाने स्वस्थ महिला,स्वस्थ गोवा उपक्रमाद्वारे आणि गोव्याचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आयब्रेस्टएक्झामचा वापर करून राज्यभरात स्तन तपासणीची व्याप्ती वाढवण्यासाठी गोवा सरकार कार्यरत आहे.ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश तपासणी सेवा थेट समुदायांपर्यंत पोहोचवून आणि त्या राज्याच्या विद्यमान आरोग्य यंत्रणेशी जोडून संपूर्ण गोव्यातील महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अधिक सुलभ बनवणे हा होता.आता ६ व्या वर्षात पदार्पण करत असताना या उपक्रमाने आतापर्यंत २.१५ लाखांहून अधिक महिलांची तपासणी केली आहे, ज्यामध्ये पुढील चाचणी आणि वैद्यकीय मूल्यांकनासाठी ३,७०० हून अधिक गाठी (लम्प्स) आढळून आल्या आहेत. आता आयब्रेस्टएक्झाम उपकरणांच्या मदतीने या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आणखी ५०,००० महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, तसेच २०२७ अखेरपर्यंत गोव्यातील वयोमर्यादेत बसणाऱ्या सर्व महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.गोवा मेडिकल कॉलेजचे डीन प्रा. डॉ. जय प्रकाश तिवारी म्हणाले, “तपासणी मोहीम अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते, तेव्हा मोहिमेचा प्रभाव अधिक व्यापक ठरतो. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रेफरल प्रक्रिया प्रबळ करत महिलांच्या दारापर्यंत स्तन तपासणी सेवा पोहोचवण्यास मदत केली आहे. ३५ ते ६४ वयोगटातील १ लाखांहून अधिक महिलांचा समावेश असलेल्या मुंबईतील २० वर्षांच्या यादृच्छिक चाचणीत दिसून आले की, तिसऱ्या किंवा चौथ्या स्‍टेजमधील स्तनाचा कर्करोग निदान होण्याचे प्रमाण नियंत्रण गटातील ४७ टक्क्यांवरून तपासणी झालेल्या गटामध्ये ३७ टक्क्यांपर्यंत खाली आले. गोवा सरकारचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला आमच्या उपक्रमात असेच यश पाहायला मिळाले आहे, ज्यामुळे आम्हाला सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान करणे शक्य झाले. संपूर्ण गोव्यातील अधिकाधिक महिलांपर्यंत हा प्रयत्न नेण्याची आम्हाला आशा आहे. जनजागृतीपासून ते सुरुवातीच्या टप्प्यातील निदान आणि उपचारांपर्यंत, ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमाने कर्करोग उपचारात सुधारणा करून थेट समुदायांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे.”या उपक्रमाला एसबीआय फाऊंडेशन आणि युवराज सिंग फाऊंडेशनने (यूवीकॅन) पाठबळ दिले आहे,तसेच राज्यभरात स्तन तपासणीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची उपलब्धता अधिक वाढवण्यासाठी मदत केली आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जि…