Home शासकीय तरतुदीचे उल्लंघन करणा-या व्यापाऱ्या विरुध्द कडक –   जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण

तरतुदीचे उल्लंघन करणा-या व्यापाऱ्या विरुध्द कडक –   जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण

38 second read
0
0
28

no images were found

तरतुदीचे उल्लंघन करणा-या व्यापाऱ्या विरुध्द कडक –   जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण

        कोल्हापूर  : तूर व उडीद डाळीच्या घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच मिलर्स व इम्पोर्टर्सकरीता साठा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. डाळीवरील साठा निर्बंध दि 30 ऑक्टोबर,2023 पर्यंत लागू राहणार असल्याचे  जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी कळविले आहे.

            तूर व उडीदडाळ साठा निर्बंध याप्रमाणे- घाऊक व्यापारी- प्रत्येक डाळीसाठी 200 मेट्रीक टन. किरकोळ व्यापारी प्रत्येक डाळीसाठी 5 मेट्रीक टन. बिग चेन रिटेलर्स- प्रत्येक डाळीसाठी प्रत्येक आउटलेटसाठी 5 मेट्रीक टन व डेपोसाठी 200 मेट्रीक टन.  मिलर्स – गत 3 महिन्यातील असलेले उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25 टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागू होईल. इम्पोर्टर्स (आयातदार )-सीमा शुल्क मंजुरीच्या (कस्टम्स क्लिअरन्सच्या) दिनांकापासून 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर मोठा साठा करुन ठेवता येणार नाही.

            कायदेशीर घटकांकडे असणारा डाळीचा साठा दि 2 जून 2023 च्या अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास तसे fcainfoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. अधिसूचनेपासून 30 दिवसाच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत डाळीचा साठा कमी करणे आवश्यक राहील.

            केंद्र शासनाच्या पोर्टलवर डाळीचा साठा नियमितपणे प्रसिध्द करणे आवश्यक आहे. सर्व संबंधितांनी केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे सक्त अंमलबजावणी करावी. डाळीवरील साठा निर्बंध दि 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू राहणार आहेत. या तरतुदीचे उल्लंघन करणा-या व्यापाऱ्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे…………………………………………..

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…