6 second read
0
0
167

no images were found

आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट: विभागीय आढावा बैठक संपन्न

 कोल्हापूर, {: मुंबई आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली.

     यावेळी रुग्णालयातील आरोग्य सेवा, स्वच्छता, रुग्णाभिमुख सुविधा व सेवा वितरणाच्या गुणवत्तेची माहिती घेत रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक असल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. याप्रसंगी आशा स्वयंसेविकांनी आपल्या कामातील अनुभव,अडचणी, सूचना आयुक्तांसमोर मांडल्या. दरम्यान चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर श्री.काटकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.प्रा रंभी उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी विभागातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची सद्यस्थिती, उपलब्धी, आव्हाने तसेच आगामी नियोजन यांचा आढावा आपल्या प्रस्ताविकामध्ये घेतला तसेच आभार ही व्यक्त केले.

      या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य व क्षयरोग अधिकारी तसेच मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी,हिवताप अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये (Nutrition Week 2026) पोषण सप्ताहानिमित्त स्पर्धा संपन्न.

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये (Nutrition Week 2026) पोषण सप्ताहानिमित्त स्पर्धा संपन्न. कोल्ह…