Home राजकीय अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा;विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा;विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

22 second read
0
0
8

no images were found

अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा;विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

    नवी दिल्ली: गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या NEET पेपरफुटीविरोधी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला होता.

          दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा देशातील विविध राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढून केंद्र सरकारविरोधात असंतोष वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारावा लागला.

              दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान कोल्हापूर (प्रतिनिधी):…