no images were found
“सेवा संकल्प अभियान” अंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर “सेवा संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या १८ शासकीय वसतिगृहे व ०४ निवासी शाळांमध्ये . ‘विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व चित्र प्रदर्शन, “मुलांच्या स्वप्नातील भारत” व “विकसित भारत २०४७ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, जनजागृती व सेवा योगदान -वसतिगृह व शाळा नजीकच्या गावात / वाडीत केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला पथकाद्वारे देण्यात येणार आहे. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्याबरोबर स्थानिक गरजेनुसार खालील सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १. अनाथालय / वृद्धाश्रम भेट २. वृक्षारोपण अभियान ३. स्वच्छता ही सेवा ४. आरोग्य तपासणी शिबिर ५. योग आणि ध्यान सत्र ६. प्लास्टिक मुक्ती जागरूकता ७. महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता ८. वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य ९. करिअर कौन्सिलिंग सत्र १०. ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता ११. व्यसनमुक्त भारत जागरूकता १२. पोषण आणि अॅनिमिया जागरूकता १३. कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग १४. सायबर सुरक्षा जागरूकता १५. वीर गाथा आणि सैनिकांचा सन्मान १६. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे वाटप या अभियानामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग घेण्यात येणार असून, स्वच्छता मोहीम विशेषत्वाने राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यालयाचे तालुका समन्वयक व समता दुत यांचे मार्फत देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.