no images were found
पी. एम. विश्वकर्मा योजनेतंर्गंत टूलकिट वाटप व स्टॉल उद्घाटन
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य तसेच विश्वकर्मा दिनानिमित्त जिल्हा कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने रेल्वे स्टेशन कोल्हापूर येथे विश्वकर्मा दिव्यांग लाभार्थ्यास ‘ वन स्टेशन – वन प्रोडक्ट ‘ च्या माध्यमातून मंजूर झालेल्या स्टॉलचे मंजुरीचे पत्र देण्यात आले. त्याचबरोबर पीएम विश्वकर्मा योजनेतील सोनार कारागिरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टूलकिट वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांनी उपस्थितांना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व सद्यस्थितीची माहिती सांगितली. याप्रसंगी MSME राज्य संचालक मिलिंद बारापत्रे,केंद्र सरकार नियुक्त अशासकीय सदस्य डॉ. आनंद गुरव, व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास पोस्ट ऑफिसचे अभिजीत जाधव,रेल्वे स्टेशनचे महाप्रबंधक श्री पोतदार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी विकास कुलकर्णी,बाजीराव सातपुते यांच्यासह जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथील सर्व कर्मचारी व विश्वकर्मा कारागीर उपस्थित होते.