Home शासकीय औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’

0 second read
0
0
32

no images were found

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’

औरंगाबाद : प्रसन्न भालचंद्र वराळे यांना शनिवारी कर्नाटकचे राज्यपाल थवरचंद गहलोत यांनी बंगळुरू येथे राजभवनात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी न्या. वराळे यांचे अभिनंदन केले.
मूळचे औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे सदस्य असलेले आणि येथेच वकिली केल्यावर व सरकारी वकील म्हणून सेवा बजावल्यानंतर येथूनच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान होऊन मुख्य न्यायमूर्तीपदापर्यंत पोहोचलेले न्या. वराळे हे तिसरे न्यायमूर्ती ठरले आहेत. त्यामुळे मागील ४ वर्षांत तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’ देऊन औरंगाबाद वकील संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
खंडपीठ वकील संघातून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान झालेले न्या. नरेश पाटील यांनी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी २०२२ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. इतकेच नव्हे तर आतापर्यंत वकिलांमधून १८ न्यायमूर्ती व ९ ज्येष्ठ विधिज्ज्ञ बनले आहेत.
मुख्य न्या. वराळे यांच्या शपथविधी सोहळ्यास औरंगाबाद खंडपीठातील न्या. रवींद्र घुगे, न्या. आर.जी. अवचट, न्या. श्रीकांत कुलकर्णी, न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. किशोर संत, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, सचिव ॲड. सुहास उरगुंडे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ राजेंद्र देशमुख, मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, आदी तसेच मुंबई मुख्य पीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती आणि वकील उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…