
no images were found
रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ३६ वे अध्यक्ष मिळाले आहेत. आज रॉजर बिन्नी हे पदावर येत सौरव गांगुली यांनी हे पद सोडले आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. ही निवडणूक केवळ औपचारिकता होती कारण त्यांची निवड आधीच ठरलेली होती.
गांगुलीला २०१९ मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती. पुढील तीन वर्षांसाठी ते पुन्हा निवडून येऊ शकले असते पण त्यांना कोणीही साथ दिली नाही. त्यामुळेच आता बीसीसीआयचा कारभार रॉजर बिन्नी पाहतील.
बीसीसीआयची नवी कार्यकारिणी अशी:-
अध्यक्ष – रॉजर बिन्नी, सचिव – जय शहा,
खजिनदार – आशिष शेलार,उपाध्यक्ष – राजीव शुक्ला, सहसचिव – देवजित सैकिया,
आयपीएलचे चेअरमन – अरुण धुमल