Home स्पोर्ट्स स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

0 second read
0
0
57

no images were found

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने सलग चौथ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. क्रीडा अधिविभाग दुसऱ्या तर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.

शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल येथे झाल्या. यामध्ये कॅम्पसवरील सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा: क्रिकेट (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट.

क्रिकेट (महिला): क्रीडा आधिविभाग, रसायनशास्त्र, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गणित.

थ्रो बॉल (महिला): फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वाणिज्य व व्यवस्थापन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल अँड डेव्हलपमेंट, प्राणीशास्त्र.

व्हॉलीबॉल (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, क्रीडा,

बुद्धिबळ (पुरुष): आदित्य सावळकर (क्रीडा), अनिकेत धोतुरे (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), अपूर्व कदम (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बुद्धिबळ (महिला): प्रतीक्षा गोसावी (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), सुरभी सिंग (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), नेहा कटके (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बॅडमिंटन (पुरुष): स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अर्थशास्त्र, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.

बॅडमिंटन (महिला): डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संगणकशास्त्र.

रस्सीखेच (महिला): क्रीडा, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गणित, शिक्षणशास्त्र.

रस्सीखेच (पुरुष): शिक्षणशास्त्र, पर्यावरणशास्त्र, क्रीडा.

अॅथलेटिक्स पुरुष आणि महिला गटात सर्वसाधारण विजेते अनुक्रमे: क्रीडा, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मराठी.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड

डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड इचलकरंजी (…