no images were found
महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभ
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपायुक्त किरणकुमार धनवाडे व प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला आज दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुधाळी येथील महापालिकेच्या शूटिंग रेंजमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. ही स्पर्धा दि. १ व २ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, रायफल शूटिंग मार्गदर्शक रमेश कुसाळे तसेच शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव उपस्थित होते.
महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये रायफल शूटिंग या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शालेय स्तरावर क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी शिवतेज खराडे, सचिन पांडव, सिद्धार्थ कुराडे, अनुराधा खुडे, युवराज चौगले, संतोष जाधव, सुहास जगदाळे, धैर्यशील देसाई, अथर्व भिवसे, ऋषिकेश वाखरेकर व विनय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.