Home स्पोर्ट्स वेसरफमध्ये ‘रेड मड 4X4 चॅलेंज’चा थरार;पेट्रोलमध्ये नचिकेत पाटील, डिझेलमध्ये अक्षय खोत, महिलांमध्ये विजापूरच्या कविता देसाई विजयी

वेसरफमध्ये ‘रेड मड 4X4 चॅलेंज’चा थरार;पेट्रोलमध्ये नचिकेत पाटील, डिझेलमध्ये अक्षय खोत, महिलांमध्ये विजापूरच्या कविता देसाई विजयी

4 second read
0
0
6

no images were found

वेसरफमध्ये ‘रेड मड 4X4 चॅलेंज’चा थरार;पेट्रोलमध्ये नचिकेत पाटील, डिझेलमध्ये अक्षय खोत, महिलांमध्ये विजापूरच्या कविता देसाई विजयी

कोल्हापूर,  : 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज – बी अनस्टॉपेबल’ ही थरारक स्पर्धा वेसरफ येथे लाल मातीत मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत पेट्रोल कॅटेगरीत नचिकेत पाटील प्रथम विजेते ठरले. डिझेल कॅटेगरीत अक्षय खोत प्रथम, सत्यदीप चिकबिरे द्वितीय तर अभिषेक गांधी तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. महिला कॅटेगरीमध्ये विजापूरच्या कविता देसाई यांनी बाजी मारली. माणकापूरचे रोहित वराळे यांना बेस्ट मार्शल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
चिखल, दगड, पाणी, तीव्र चढ आणि वळणांनी भरलेला हा खडतर ट्रॅक हे मोठे आव्हान होते. नचिकेत पाटील यांनी वेग आणि अचूक नियंत्रणाने ट्रॅक पार केला. डिझेल गटात अक्षय खोत, सत्यदीप चिकबिरे आणि अभिषेक गांधी यांच्यात अटीतटीची लढत झाली. पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात विजापूरच्या कविता देसाई यांनी जिद्दीने विजय मिळवला.
वेसरफ येथील आजरी इको व्हॅलीमध्ये पार पडलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला अश्विन शिंदे, प्रशांत काशीद, पल्लवी यादव, कुणाल धुम्मा, कृष्णकांत जाधव, विनायक शिंदे, दिग्विजय लोळगे, यांच्यासह 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, स्पर्धक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

मोदी सरकारकडून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई; ‘ऑपरेशन ट्रायडंट’अंतर्गत ३८ ठिकाणी कारवाईची अमित शाह यांची घोषणा

मोदी सरकारकडून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई; ‘ऑपरेशन ट्रायडंट’अंतर्गत ३८ ठि…