Home स्पोर्ट्स राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

12 second read
0
0
8

no images were found

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन : १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग

 कोल्हापूर, : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल (१४ वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड  यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे व्हा. चेअरमन डी.जी. किल्लेदार, महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिऐशन सचिव राजाराम राऊत, एस.व्ही. सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

     सन २०२६-२७ मधील राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. १४ वर्षांखालील मुले व मुलींसाठी ही स्पर्धा दि. १० ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये मुलांचे ९ संघ आणि मुलींचे ८ संघ, असे एकूण १७ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघासोबत १६ खेळाडू तसेच १ प्रशिक्षक व १ व्यवस्थापक यांचा समावेश नियोजित आहे.  या स्पर्धेत मुलांचे संघ ९, मुलींचे संघ-८, एकूण सहभागी संघ-१७, निवड चाचणी खेळाडू व एकूण खेळाडू-२७२, पंच व तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक, निवड समिती सदस्य-५०, खेळाडू निवड चाचणीसाठी नियोजित संख्या-८० एकूण सहभाग संख्या ४०२ अशी असणार आहेत.

    या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्याच्या विविध भागांतून सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे आरोग्य, सुरक्षितता आणि सोयी-सुविधांचा विचार करून महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे निवासाचे नियोजन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

महिला व बालविकास क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

महिला व बालविकास क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर प्रधानमंत्री नरेंद…