Home सामाजिक “आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात” – जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल

“आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात” – जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल

2 second read
0
0
13

no images were found

“आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात” – जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल : सायबर जनजागृती मोहिमेचा एनआयटीमधून शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे महिनाभर चालणाऱ्या ‘सायबर जनजागृती मोहिमेचा’ शानदार शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधून झाला, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात गेल्या वर्षी सायबर गुन्हेगारांनी लोकांना तब्बल २३००० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. काॅलेजवयीन तरूण-तरूणींच्या फोटोंचे एआयद्वारे माॅर्फिंग करणे, ॲप, ईमेल व मेसेजमधून आमिष दाखवून मोबाईलचा ताबा घेणे, डिजिटल अटक करणे असे प्रकार वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी मोबाईलचा वापर गरजेपुरता ठेवावा, आपली बँकिंग माहिती, फोटो, व्हिडिओ इतरांना देवू नयेत, .apk व तत्सम फाईल्स उघडू नयेत, ऑनलाईन आर्थिक व्यवहार खात्री करूनच करावेत. एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी सायबर सुरक्षेस पूरक असलेल्या मोबाईलमधील संयोजनांची व क्लुप्त्यांची माहिती दिली. यावेळी सायबर संस्थेच्या डी. के. शिंदे समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा. महेंद्र जनवाडे यांच्या मार्गदर्शनात सायबर क्राईम विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच, एनआयटीमधील एनएसएस आणि एआय नेक्सस क्लबच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा विषयक फलक प्रदर्शित केले. सायबर जनजागृती रथाला नीलोत्पल यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीद्वारे रवाना केले. हा रथ या महिनाअखेरपर्यंत जिल्हाभर फिरून नागरिकांना सायबर जनजागृती करणार आहे. चुकून सायबर गुन्ह्यास बळी पडल्यास हेल्पलाईन नंबर १९३० द्वारे आमच्याकडे तक्रार नोंदवावी, असे सायबर क्राईम कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक हारूगडे यांनी प्रस्तावना करताना सांगितले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी नीलोत्पल यांनी एनआयटीचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले. यावेळी सायबर क्राईम विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, एनआयटीमधील रजिस्ट्रार संदीप पंडे, विभागप्रमुख, स्टाफ व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

महिला व बालविकास क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

महिला व बालविकास क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर प्रधानमंत्री नरेंद…