no images were found
मलाबार ग्रुपच्या स्थापना दिनानिमित्त सांगलीत स्वच्छता अभियान
सांगली : मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या सांगली शोरूमतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि आमराई उद्यान येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित या मोहिमेत कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन (ESG) या तत्त्वांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानात मलाबार ग्रुपच्या ९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीप्रती कंपनीची बांधिलकी व्यक्त केली. तसेच येत्या वर्षभरात देशभरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
मलाबार ग्रुपतर्फे ‘हंगर फ्री वर्ल्ड’, वंचित मुलांसाठी मायक्रो लर्निंग सेंटर्स, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना आणि ज्येष्ठ महिलांसाठी ‘ग्रँडमा होम्स’ यांसारखे सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत.