Home Uncategorized विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्या सात व्यावसायिकांना महापालिकेच्या नोटिसा

विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्या सात व्यावसायिकांना महापालिकेच्या नोटिसा

15 second read
0
0
18

no images were found

विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्या सात व्यावसायिकांना महापालिकेच्या नोटिसा

अनधिकृत होर्डिंग्ज, एलईडी स्क्रीन स्वतःहून हटविण्याचे इस्टेट विभागाचे आवाहन

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत शहरातील विनापरवाना होर्डिंग्जची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान भाऊसिंगजी रोड, नागाळा पार्क आणि शाहूपुरी परिसरात कायमस्वरूपी लोखंडी स्ट्रक्चर उभारून विनापरवाना होर्डिंग लावल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी घाटगे इस्टेट डेव्हलपर्स, एस.एस. रिटेल, सरोज एजन्सी, मलबार गोल्ड अँड डायमंड्स, योगीराज मोबाईल, सांगावकर जंबो कलर झेरॉक्स तसेच दामोदर शिवराम अँड कंपनी या सात व्यावसायिकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

            महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंग्ज लावण्यासाठी इस्टेट विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित व्यावसायिकांनी कोणतीही परवानगी न घेता कायमस्वरूपी लोखंडी स्ट्रक्चर उभारल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे संबंधितांना नोटीस देऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त किरण धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, वरिष्ठ लिपिक मदन मोरे आणि एन.डी.एस. पथकाने केली.

            शहरातील सर्व होर्डिंग्जधारकांनी महापालिकेच्या इस्टेट विभागाची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय होर्डिंग्ज अथवा एलईडी स्क्रीन लावू नयेत. परवानगी न घेता होर्डिंग्ज किंवा एलईडी स्क्रीन लावले असल्यास संबंधितांनी ते स्वतःहून हटवावेत किंवा नियमित परवानगी घेण्यासाठी शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरील महापालिकेच्या इस्टेट विभागाशी संपर्क साधावा. अन्यथा अनधिकृत होर्डिंग्ज व एलईडी स्क्रीन जप्त करून संबंधितांवर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ

अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ सं…