Home मनोरंजन प्रवाह पिक्चरवर १८ डिसेंबरला सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

प्रवाह पिक्चरवर १८ डिसेंबरला सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

9 second read
0
0
110

no images were found

प्रवाह पिक्चरवर १८ डिसेंबरला सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांमधील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट’ असं ठणकावून सांगणारे हंबीरराव स्वराज्यनिष्ट सेनापती होतेच त्यासोबतच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारा योद्धा अशी त्यांची ख्याती होती. अश्या या शूरवीराच्या पराक्रमाची गोष्ट सांगणाऱ्या सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. रविवार १८ डिसेंबरला दुपारी १ वाजता हा ऐतिहासिक सिनेमा भेटीला येईल.

सुप्रसिद्ध अभिनेता प्रविण तरडे यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनासोबतच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका देखिल साकारली आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत आहे.

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेला चंद्रमुखी सिनेमा जवळपास १ कोटी २५ लाख प्रेक्षकांनी पाहिला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…