no images were found
१७१ जागासह आपचा दिल्ली महानगरपालिकेवर झेंडा; भाजपच्या सत्तेला सुरुंग
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेत अखेर आपने बाजी मारली आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता होती. १७१ जागा जिंकत आपचा दिल्ली महानगरपालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर भाजपला १०७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच दिल्ली पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार आहेत. २०१७ मध्ये, भाजपने तत्कालीन २७० पैकी १८१ नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर आपने फक्त ४८ जिंकले होते. कॉंग्रेस ३० जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर होती.