no images were found
खडसे – शाह यांची भेट?; खडसेच्या घरवापसीची चर्चा
मुंबई : एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या चर्चेवरुन राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे.
याच चर्चांवरुन एकनाथ खडसे हे भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना ऊत आलाय. याबाबत आता भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सासरे एकनाथ खडसे दिल्लीत अमित शाहांशी भेट झाल्याच्या दाव्याला नकार दिला आहे. मात्र दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्यातील चर्चेमागचा सस्पेन्स कायम आहे.
या सर्व अफवा – एकनाथ खडसे “राष्ट्रवादीचा त्याग करुन मी भाजपात जाणार या निव्वळ अफवा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मला आमदारकी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा त्याग करण्याचा प्रश्न मनात येत नाही. मी अमित शाह यांची भेट घेतलेली नाही. मी त्यांच्यासोबत फोनवरुन बोलणं केलं आहे. याची कल्पना मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला सांगितलं की, मी स्वतः तुमच्यासोबत येईन. काही विषय त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. शरद पवार सोबत असताना ते भाजपमध्ये येण्यासाठी प्रस्ताव देणार नाहीत. त्यामुळे या सर्व अफवा आहेत,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.