Home क्राईम पुण्यात निर्भायाची पुनारावृत्ती ! तरूणीवर क्रुर अमानुष अत्याचार

पुण्यात निर्भायाची पुनारावृत्ती ! तरूणीवर क्रुर अमानुष अत्याचार

0 second read
0
0
211

no images were found

पुण्यात निर्भायाची पुनारावृत्ती ! तरूणीवर क्रुर अमानुष अत्याचार
पुणे : विद्देचे माहेरघर असलेल्या पुण्यात निर्भायाची पुनारावृत्ती झाल्याने प्रचंड खळबळ उसळी आहे.निगडी मधील गंगानगर परिसरात राहत असलेल्या एका तरूणीवर तीन-चार तरूणांनी क्रुर पध्दतीने अत्याचार केला आहे. या नराधमांनी तरूणीच्या अंगावर दारू ओतली त्यानंतर तरूणीच्या तोंडात मिर्ची पावडर कोंबली, नंतर या तरूणीच्या शरिरावर आणि गुप्त अंगावर दारू ओतून ब्लेडने वार केले आहेत. याविरोधात पीडित तरूणीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ही घटना दि. 22 ला घडली आहे. पिडीत तरूणी रस्त्यावरून जात होती. ती कणीस घेण्यासाठी एका ठिकाणी उभा राहिली. यावेळी काही तरूण तिथे आले, त्यांच्या हातात कोयते होते, त्यातील एक आरोपी म्हणाला हिला पकडा (पिडीतेला) हे ऐकून पिडीत तरूणीने तेथून पळ काढला. धावत असताना ती जवळ असलेल्या पांढरकर सभागृहाच्या मागील गुरुदेवनगर येथील सार्वजनिक शौचालयामध्ये लपून बसली. मात्र आरोपींनी तिला शोधले.
आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची पिडीतेच्या बहिणीने निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरून एकाला अटक केली आहे, तर बाकी आरोपींचा शोध निगडी पोलिस करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…