no images were found
1 ऑक्टोबरला PM मोदींच्या हस्ते होणार 5G सेवेचा प्रारंभ
देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करणार आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनकडून ट्विटवरून ही माहिती देण्यात आली. प्रगती मैदानावर होणारी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’ 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
5G वापरकर्त्यांना 4G पेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल. पहिल्या टप्प्यात केवळ 13 निवडक शहरांना हायस्पीड 5G इंटरनेट सेवा मिळेल. या शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. या नमूद शहरांतील प्रत्येक नागरिकाला 5G सेवा मिळू शकत नाही. हे शक्य आहे की दूरसंचार कंपन्या या शहरांमधील निवडक भागात 5G सुविधा प्रदान करतील. परंतु याबाबत अद्याप माहिती कळविण्यात आलेली नाही.