Home क्राईम मुलं चोर समजून तोंडाला रुमाल बांधलेल्या महिलेला बेदम मारहाण

मुलं चोर समजून तोंडाला रुमाल बांधलेल्या महिलेला बेदम मारहाण

0 second read
0
0
136

no images were found

मुलं चोर समजून तोंडाला रुमाल बांधलेल्या महिलेला बेदम मारहाण
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात सदानंद चौकात महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. संशयावरून नागरिकांनी तिला मारहाण केली. त्या महिलेचं नागरिकांनी काही एक ऐकून न घेता जोड्या आणि चपलांनी मारहाण केली. तसेच महिलेला पोलीस ठाण्यात नेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही महिला खंडवा येथील असून तिचे कुणीही नातेवाईक नाही. पण मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते काम करून महिला तिचा उदरनिर्वाह भागवते, अशी माहिती समोर आली आहे. त्या महिलेचा चेहरा पूर्णतः जळलेला होता. यामुळे तिने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र नागरिकांनी घटनेची खातरजमा न करता कायदा हातात घेत महिलेला मारहाण केली. महिलेची चौकशी करून त्या महिलेला जळगाव येथील आशादीप या शासकीय वसतीगृहात दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षिक के. के. पाटील यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे मॅसेज सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. कुठे अशी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…