
no images were found
मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद
छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रातून कामकाज सुरु
कोल्हापूर (प्रतिनिधी):-महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रातील सर्व संगणकीय साहित्य व फर्निचर हलवावे लागणार आहे. त्यामुळे मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रातील कामकाज दि.५ ते ०९ मार्च २०२५ पर्यंत 5 दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत जन्म-मृत्यू नोंदणी पावती करणे, घरफाळा, पाणीपट्टी व इतर शुल्क भरण्याचे कामकाज छत्रपती शिवाजी मार्केट इमारत येथील नागरी सुविधा केंद्रातून सुरु राहील. तसेच जन्म, मृत्यू प्रमाणपत्र वितरण मुख्य इमारतीमधून श्री नागेश्वर मंदिरावरील कार्यालयातून सुरु ठेवण्यात येणार आहे. तरी याची संबंधीत नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.