no images were found
कर्जाच्या बोजामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण: संदीप देसाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा आकडा हा जवळपास साडे नऊ लाख कोटीच्या जवळ पोचला असून, कर्जाच्या बोजामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण असल्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत आहे.
शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, ती तुटपुंजी असून, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने कोणताही ठोस कृती कार्यक्रम दिसून येत नाही.एकूणच “बडा घर आणि पोकळ वासा” अशा पद्धतीचा वाढत्या महसुली तूटीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी सादर केला आहे. अशी प्रतिक्रिया आम आदमीची संदीप देसाई यांनी दिली आहे.