no images were found
कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
कोल्हापूर, : महिलांच्या फॅशन क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड क्रॉस जीन्सने कोल्हापुरात आपल्या पहिल्या दालनाचे उद्घाटन करत शहरात प्रवेश केला आहे. सुमारे 527 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या हाय-स्ट्रीट स्टोअरमध्ये सुपर वाइड लेग, स्ट्रेट फिट, वाइड लेग जीन्स, स्प्रिंग-समर 2026 (SS’26) कलेक्शन, लिनन कलेक्शन तसेच महिलांसाठी बेबी टीजची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.
दालनाच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून 3 किंवा अधिक उत्पादने खरेदी केल्यास 50 टक्के सूट दिली जाणार आहे.
क्रॉस जीन्स हे प्रीमियम डेनिम आणि समकालीन कॅज्युअल फॅशनसाठी ओळखले जाते. आरामदायी, आकर्षक आणि भारतीय शरीरयष्टीला अनुरूप डिझाइन्समुळे या ब्रँडने ग्राहकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोल्हापूरमधील वाढती फॅशनची आवड आणि आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन शहराची विस्तारासाठी निवड करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
या नव्या दालनामुळे क्रॉस जीन्सचे भारतातील एकूण 34 विशेष ब्रँड आउटलेट्स झाले असून महाराष्ट्रासह छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे.