no images were found
व्यक्तिमत्त्व विकासावर अतिथी व्याख्यान संपन्न
कोल्हापूर( प्रतिनिधी):- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे बुधवारी युवाशक्तीचे सक्षमीकरण : जीवनमूल्ये, पर्यावरण आणि स्व-विकास यांचा समन्वय या विषयावर व्यक्तिमत्त्व विकासाचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानासाठी श्री. शिवाजी बी. नेरली (बी.ए.), प्रेरणादायी वक्ते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व, जीवनातील नैतिक मूल्ये, पर्यावरणाविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि स्व-विकास याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा आणि भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. ए. आर. पुजारी मॅडम उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजाश्री पाटील मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. रचना पाटील मॅडम यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन श्री. योगेश के. पुजारी सर यांनी केले. त्यांनी प्रमुख वक्ते, प्राचार्या तसेच उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थिनींना व्यक्तिमत्त्व विकास, सकारात्मक विचारसरणी आणि जीवनमूल्यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.