no images were found
एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
अहमदाबाद, : अदाणी सिमेंट पोर्टफोलिओचा भाग असलेल्या आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बांधकाम साहित्य व सोल्यूशन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसीसी लिमिटेडने 30 जून 2026 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले.
एसीसी लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनोद बहेती म्हणाले, “व्यापारी विक्रीतील वाढलेला वाटा आणि प्रीमियम उत्पादनांवरील वाढत्या भरामुळे आम्ही 2026-27 या आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. या तिमाहीत मोठ्या एकात्मिक (इंटिग्रेटेड) प्रकल्पांमध्ये नियोजित देखभाल, तसेच मूळ कंपनी अंबुजा सिमेंट्ससोबत वाढलेले मटेरियल सप्लाय अरेंजमेंट (एमएसए) यांचा नफ्यावर काही परिणाम झाला. तरीही आम्ही मूल्याधारित वाढ आणि दर्जेदार उत्पन्नावर लक्ष केंद्रित ठेवले आहे.
‘वन सिमेंट प्लॅटफॉर्म’ उभारण्याच्या प्रस्तावाद्वारे अधिक सोपी, मजबूत आणि एकात्मिक कंपनी निर्माण करण्याचा आमचा प्रवास सुरू आहे. यासोबतच सलई बनवा आणि कलंबोली येथील क्षमता विस्तार, CiNOCच्या माध्यमातून कार्यक्षमतेत सुधारणा आणि ग्राहककेंद्रित उपाययोजनांमुळे येत्या तिमाहींमध्ये कामगिरी आणखी सुधारेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या एकात्मिक व्यवसाय मॉडेलची ताकद आणि अदाणी समूहातील समन्वयाचा लाभ घेत, अदाणी सिमेंट समूहाने एकत्रित पातळीवर आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये प्रति मेट्रिक टन सुमारे 250 रुपयांची खर्च कपात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”
कंपनीची एकूण निव्वळ संपत्ती 20,562 कोटी असून 375 कोटींची रोख रक्कम आणि समतुल्य निधी उपलब्ध आहे. तसेच, क्रिसिल आणि केअर यांनी कंपनीला सर्वोच्च AAA / A1+ क्रेडिट रेटिंग दिले आहे. मजबूत रोख प्रवाहामुळे कंपनीचा भांडवली गुंतवणूक कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे.
कंपनीच्या रेडी मिक्स काँक्रीट (RMX) व्यवसायाचा विस्तार होऊन प्लांट्सची संख्या 119 वर पोहोचली आहे. या व्यवसायातील विक्रीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 17% वाढून 0.97 दशलक्ष घनमीटर झाले असून, 33 कोटी EBITDA नोंदवला आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंट्सचे प्रस्तावित विलीनीकरण करून ‘वन सिमेंट प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 4 जून 2026 रोजी सेबी कडून NOC मिळाले असून, 29 जून 2026 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ (NCLT) कडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर हे विलीनीकरण आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
एसीसी ला बिझनेस टुडेने सिमेंट क्षेत्रातील भारतातील सर्वात शाश्वत कंपनी 2026 म्हणून गौरवले आहे. कंपनीच्या ब्लेंडेड सिमेंट उत्पादनांना CII कडून ग्रीनप्रो प्रमाणपत्र मिळाले असून, शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांधकाम उपायांसाठी कंपनीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच, बिल्डसेम आणि बिल्डसेम प्रो या नव्या उत्पादनांसह संपूर्ण ब्लेंडेड सिमेंट पोर्टफोलिओला GRIHA प्रमाणपत्र मिळाले आहे. नवीकरणीय ऊर्जा, पाणी संवर्धन, कचरा पुनर्वापर, संसाधन कार्यक्षमता, वृक्षारोपण आणि सामाजिक विकास उपक्रमांमध्येही कंपनीने सातत्याने प्रगती केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी डिजिटल BRSR रिपोर्ट लाँच करून कंपनीने ESG कामगिरीची माहिती भागधारकांसाठी अधिक सोपी आणि पारदर्शक केली आहे.
एसीसीच्या जमूल प्लांटला पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी 18व्या सीआयआय नॅशनल ईएचएस एक्सलन्स अवॉर्डमध्ये सिल्व्हर पुरस्कार मिळाला आहे. तसेच, अमेठा प्लांटला आरोग्य, सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल इंटरनॅशनल सेफ्टी अवॉर्ड 2026 (मेरिट श्रेणी) मिळाला आहे.
पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थितीमुळे आयात केलेल्या पेटकोक आणि थर्मल कोळशाच्या किमती तसेच वाहतूक खर्च वाढल्याने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत सिमेंट उद्योगावर खर्चाचा दबाव आला. कंपनी इंधन मिश्रणातील सुधारणा, नवीकरणीय ऊर्जेचा अधिक वापर, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि खर्च नियंत्रणाच्या उपायांद्वारे हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जीडीपी वाढ 7.7% राहिली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये सिमेंटची मागणी सुमारे 5% राहण्याचा अंदाज आहे. पावसाळा, भू-राजकीय अनिश्चितता आणि कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उतारांमुळे सिमेंटच्या मागणीवर अल्पकालीन परिणाम होऊ शकतो, मात्र पायाभूत सुविधा विकास, शहरीकरण आणि घरांच्या वाढत्या मागणीमुळे सिमेंट उद्योगाचा दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे.