no images were found
अदाणींच्या कच्छ कॉपर आणि चिलीच्या कोडेल्को यांच्यात चिलीतील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनसाठी महत्त्वाचा करार
अहमदाबाद/सॅंटियागो, : अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडची कंपनी कच्छ कॉपर लिमिटेड (केसीएल) आणि चिलीची कॉर्पोरासिओन नॅसिओनल डेल कोब्रे (कोडेल्को) यांनी चिलीमधील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनसाठी धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी केली आहे. हा प्रकल्प उत्तर चिलीतील अँटोफागास्टा प्रदेशातील कॅलामा कॉपर बेल्टमध्ये आहे. हा परिसर जगातील महत्त्वाच्या कॉपर उत्पादन क्षेत्रांपैकी एक आहे. या एमओयू मध्ये दोन्ही कंपन्यांमधील संभाव्य एक्सप्लोरेशन पार्टनरशिपसाठी महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
या एमओयू वर नुकतीच लंडन येथे आयोजित एलएमई वीक 2026 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी केसीएल चे संचालक श्री.जीत अदाणी,अदाणी नॅचरल रिसोर्सेसचे सीईओ डॉ.विनय प्रकाश आणि कोडेल्कोचे अध्यक्ष श्री. बर्नार्डो फॉन्टेन उपस्थित होते.
केसीएल चे संचालक जीत अदाणी म्हणाले,“कॉपरसारखी महत्त्वाची खनिज संपत्ती आपल्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही भागीदारी केवळ खाण प्रकल्पापुरती मर्यादित नसून भारताच्या भविष्यासाठी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे. जागतिक स्तरावर कॉपर संसाधनांपर्यंत मजबूत पोहोच निर्माण करून आम्ही भारताच्या महत्त्वाच्या उद्योगांसाठी मजबूत सप्लाय चेन तयार करत आहोत. यामध्ये रिन्यूएबल एनर्जी, अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. भारताची रिसोर्स सिक्युरिटी मजबूत करण्यासाठी आणि देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रवासाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हे या भागीदारीतून दिसून येते.”
कोडेल्कोच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष बर्नार्डो फॉन्टेन म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून अदाणी समूहासोबत सुरू असलेल्या कामाच्या दृष्टीने हा एमओयू एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रक्रियेमुळे जागतिक स्तरावरील चांगल्या भागीदारांना आकर्षित करण्याची आणि आपल्या एक्सप्लोरेशन पोर्टफोलिओ मधून अधिक मूल्य निर्माण करण्याची कोडेल्को ची क्षमता दिसून येते. तसेच कंपनी आणि चिली सरकारचे दीर्घकालीन हित जपण्यावरही आमचा भर आहे.”
अदाणी समूहासाठी ही प्रस्तावित भागीदारी जागतिक स्तरावर एक मजबूत आणि विविध देशांमध्ये विस्तारलेली कॉपर व्हॅल्यू चेन तयार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे चिलीमधील कॉपर संसाधने भारतातील मुंद्रा येथील कॉपर स्मेल्टर कॉम्प्लेक्सशी जोडली जातील. तसेच इलेक्ट्रिफिकेशन आणि जागतिक एनर्जी ट्रान्झिशन साठी महत्त्वाच्या असलेल्या कॉपरचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत होईल.
कोडेल्को साठी हा उपक्रम पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप च्या माध्यमातून आपल्या एक्सप्लोरेशन पोर्टफोलिओ मधून अधिक मूल्य निर्माण करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. यामुळे प्रकल्पातील जोखीम विभागून घेता येईल आणि विकासाची क्षमता असलेल्या कॉपर प्रकल्पांचे काम अधिक वेगाने पुढे नेता येईल.
या सहकार्यामुळे क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रात भारत आणि चिली यांच्यातील सहकार्यालाही अधिक बळ मिळणार आहे. दोन्ही देशांसाठी खनिज संसाधनांची सुरक्षित उपलब्धता हा सध्या महत्त्वाचा विषय बनला आहे.
या प्रस्तावित भागीदारीमुळे काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनला पुढे नेण्यासाठी अदाणी समूहाकडून भांडवल, टेक्नॉलॉजी आधारित एक्सप्लोरेशन आणि मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची क्षमता उपलब्ध होईल. तर कोडेल्को कडून भूगर्भशास्त्राचे सखोल ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळेल. दोन्ही कंपन्यांचा जबाबदारीने एक्सप्लोरेशन करणे, सुरक्षिततेचे आणि पर्यावरणाचे उच्च स्टँडर्ड्स पाळणे तसेच दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे यावर भर असेल.