Home मनोरंजन कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी

कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी

2 second read
0
0
4

no images were found

कलाकारांनी जागवल्या जुन्या आठवणी

 बालपण म्हणजे अनेकदा निश्चिंत दिवस, निरागस खोड्या, मोठी स्वप्नं आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या मैत्रीच्या आठवणी. वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थी असण्यापासून आणि निरुपद्रवी खोड्या करताना पकडले जाण्यापर्यंत, भविष्याबद्दल स्वप्नं पाहण्यापासून ते लहान वयातच जबाबदाऱ्या स्वीकारण्यापर्यंत, प्रत्येकाच्या बालपणात पुन्हा एकदा अनुभवाव्याशा वाटणाऱ्या असंख्य कथा दडलेल्या असतात. यंदाच्या बालदिनानिमित्त, सोनी सबचे कलाकार तोरल रसपुत्रा, दीक्षा जोशी आणि नितीन बाबू जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. त्यांनी त्यांना घडवणारे क्षण, पुन्हा अनुभवाव्याशा वाटणाऱ्या आठवणी आणि आज स्वतःच्या लहान वयातील रूपाला कोणता सल्ला देतील, याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

   हस्तिनापूर के वीरमध्ये कुंतीची भूमिका साकारणाऱ्या तोरल रसपुत्रा म्हणाल्या, “लहानपणी मी नेहमी अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहायचे. मला आठवतं, मी पडद्यावरचे अभिनय पाहायचे आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत त्या पडद्याच्या दुसऱ्या बाजूला असणं कसं असेल, याची कल्पना करायचे. हे एक असं स्वप्न होतं जे मी मोठी होत असतानाही माझ्यासोबत राहिलं आणि आज मागे वळून पाहताना मला खूप कृतज्ञ वाटतं की माझ्या बालपणीच्या त्या आकांक्षेला वास्तवात उतरवण्याची संधी मला मिळाली. जर मला माझ्या लहान वयातील स्वतःला भेटता आलं असतं, तर मी तिला त्या स्वप्नावर विश्वास ठेवत राहायला आणि प्रवास कितीही आव्हानात्मक झाला तरी तिची आवड कधीही सोडू नकोस, असं सांगितलं असतं. तसेच, काहीही शक्य वाटत असलेल्या भविष्याची कल्पना करण्याचा तो उत्साह पुन्हा एकदा अनुभवायला मलाही आवडलं असतं.”

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये दीप्तीची भूमिका साकारणाऱ्या दीक्षा जोशी म्हणाल्या, ““जेव्हा मी शाळेचा विचार करते, तेव्हा मला लगेच मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल आणि अगदी छोट्यातली छोटी गोष्टही कशी मोठ्या साहसात बदलायची, याची आठवण येते. मी नक्कीच अशी व्यक्ती होते जिला वर्गमित्रांसोबत मनमुराद हसायला आवडायचं आणि आमच्या आजूबाजूला नेहमी काही ना काही खोड्या सुरू असायच्या. मला आठवतं, वर्गात आम्ही हसू आवरण्याचा खूप प्रयत्न करायचो आणि मग अगदी अनपेक्षित क्षणी मोठ्याने हसायला लागायचो! मागे वळून पाहताना, ह्याच आठवणी मी सर्वाधिक जपून ठेवलेल्या आहेत. जर मला पुन्हा एकदा लहान होता आलं, तर मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबतचा तसा एखादा साधासुधा शाळेचा दिवस पुन्हा जगायला आवडेल. मी माझ्या लहान वयातील स्वतःला एवढंच सांगेन की त्या क्षणांचा मनापासून आनंद घे, कारण पुढे जाऊन ह्याच आठवणी आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी बनतात.”

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये चिरागची भूमिका साकारणारे नितीन बाबू म्हणाले, “माझ्या मते, मोठं होताना आपण खूप काही शिकत असतो, विशेषतः जेव्हा लहान वयातच जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. मला आठवतं, मला छोटी-छोटी कामं दिली जायची आणि ती पार पाडण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला जातोय यामुळे मला खूप मोठं झाल्यासारखं वाटायचं. त्या वेळी ती साधी कामं वाटत असतील, पण आता मागे वळून पाहताना मला जाणवतं की त्यांनी मला जबाबदार आणि स्वावलंबी बनण्याबद्दल किती काही शिकवलं. जर मला माझं बालपण पुन्हा जगता आलं, तर मला ते दिवस पुन्हा अनुभवायला आवडतील, पण यावेळी थोडं कमी गंभीरपणे आणि खूप जास्त खेळत! मी माझ्या लहान वयातील स्वतःला सांगेन की जबाबदार असणं महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर मजेसाठी वेळ काढणं आणि बालपणाचा आनंद घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अदाणींच्या कच्छ कॉपर आणि चिलीच्या कोडेल्को यांच्यात चिलीतील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्लोरेशनसाठी महत्त्वाचा करार

अदाणींच्या कच्छ कॉपर आणि चिलीच्या कोडेल्को यांच्यात चिलीतील काबुरकाला प्रकल्पाच्या एक्सप्ल…