Home मनोरंजन “पुष्पाची भूमिका साकारताना माझा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,”: करुणा पांडे 

“पुष्पाची भूमिका साकारताना माझा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,”: करुणा पांडे 

4 second read
0
0
5

no images were found

“पुष्पाची भूमिका साकारताना माझा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,”: करुणा पांडे 

सोनी सबचा पुष्पा इम्पॉसिबल हा शो एका अशा महिलेची कथा सांगत प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे, जी आयुष्यातील आव्हानांना धैर्य, आशावाद आणि जिद्दीने सामोरी जाते. वर्षानुवर्षे, पुष्पाच्या प्रवासाने असंख्य महिलांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची, योग्य गोष्टीसाठी उभं राहण्याची आणि कितीही अडचणी आल्या तरी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा दिली आहे. कठीण परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आणि त्यातून ताकद मिळवण्याची पुष्पाची क्षमता तिला अनेकांसाठी प्रेरणेचा आणि आपलेपणाचा स्रोत बनवते. या प्रवासाचा प्रभाव पुष्पाची भूमिका चार वर्षांहून अधिक काळ साकारणाऱ्या करुणा पांडे यांच्यावरही झाला आहे. या प्रक्रियेत अभिनेत्रीने या व्यक्तिरेखेसोबत एक अतिशय घट्ट नातं निर्माण केलं असून, तिच्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देणारे अनेक मौल्यवान जीवनधडेही शिकले आहेत.

     करुणा यांच्यासाठी, पुष्पाची भूमिका साकारणं हा केवळ अभिनयकलेपलीकडचा एक शिकण्याचा अनुभव ठरला आहे. या व्यक्तिरेखेने त्यांचा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ केला असून, स्वतःच्या मनावर विश्वास ठेवणं, स्वतःच्या निर्णयांवर श्रद्धा ठेवणं आणि जे योग्य वाटतं त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे तिला शिकवलं आहे. पुष्पाप्रमाणेच करुणा देखील आयुष्यातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात आणि आयुष्यातील अनुभवांतून ताकद मिळवण्याच्या तिच्या क्षमतेचं त्या कौतुक करतात. वर्षानुवर्षे हे नातं इतकं खास बनलं आहे की करुणा दररोज सेटवर येण्याची आतुरतेने वाट पाहतात, कारण त्यांना पुन्हा एकदा पुष्पाच्या विश्वात प्रवेश करण्याचा आनंद अनुभवायचा असतो.

 

शिकलेल्या धड्यांबद्दल बोलताना करुणा पांडे म्हणाल्या, “पुष्पाची भूमिका साकारल्यामुळे माझा स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आमच्यात अनेक गुण सामायिक आहेत आणि गेली चार वर्षे तिची भूमिका साकारताना त्या गुणांशी माझं नातं आणखी घट्ट झालं आहे. पुष्पाने मला माझ्या मनावर विश्वास ठेवायला, माझ्या निर्णयांवर श्रद्धा ठेवायला आणि जे मला योग्य वाटतं त्यासाठी ठामपणे उभं राहायला शिकवलं आहे. तिच्या प्रवासाने मला हेही जाणवून दिलं की अनेकदा आयुष्य आपल्यासमोर जे अनुभव आणतं, त्यातूनच आपल्याला आपली खरी ताकद सापडते. मी दररोज सेटवर येण्याची मनापासून वाट पाहते, कारण मला रोज पुष्पा बनण्याची संधी मिळते. इतकी वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर आता मला असं वाटतं की पुष्पा माझ्याच व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनली आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

खा. महाडिक यांच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्‍यांना दीपावली निमित्त झाले नव्या कपड्यांचे वाटप

खा. महाडिक यांच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्‍यांना…