Home मनोरंजन अभिनेत्री जुई गडकरीच्या दमदार अभिनयाचं कौतुक

अभिनेत्री जुई गडकरीच्या दमदार अभिनयाचं कौतुक

5 second read
0
0
10

no images were found

अभिनेत्री जुई गडकरीच्या दमदार अभिनयाचं कौतुक

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या आश्रमातील मुलींच्या तस्करीचं गंभीर प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी सायली ठामपणे लढा देत आहे. या खटल्याचा अंतिम टप्पा जवळ आला असताना न्यायालयात सायलीने केलेल्या प्रभावी युक्तिवादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या दमदार अभिनयातून या प्रसंगातील भावनिकता, संताप आणि स्त्रीसुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

      या सीनमध्ये सायली केवळ एका खटल्याची बाजू मांडत नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करते. अत्याचारग्रस्त मुलींकडे केवळ पीडित म्हणून न पाहता त्यांची स्वतःची ओळख, स्वप्नं आणि कुटुंब आहे, याची जाणीव ती न्यायालयाला करून देते. नवरात्रीत देवीची पूजा करणारा समाज अकराव्या दिवशी स्त्रीला तोच सन्मान देतो का? असा थेट सवालही सायली उपस्थित करते. मुलींच्या कपड्यांवर, वागण्यावर आणि बाहेर जाण्यावर बंधनं घालण्याऐवजी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज ती अधोरेखित करते. ‘चूक त्या स्त्रियांच्या वागण्यात नसते जज साहेब, त्या पुरुषांच्या नजरेत असते,’ हा तिचा संवाद स्त्रीसुरक्षेच्या प्रश्नावर समाजाला अंतर्मुख करणारा आहे.

     प्रत्येक आईने आपल्या मुलीला अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ द्यावं आणि मुलाला प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार द्यावेत, असा महत्त्वपूर्ण संदेशही सायली देते. तिच्या मते, सुरक्षित समाज घडवण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. ‘आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी असा स्वच्छ समाज घडवायला हवा, ज्या समाजात माणसं राहत असतील, राक्षस नाही,’ हा तिचा संवाद विशेष लक्षवेधी ठरतो.

    जुई गडकरीने आपल्या अभिनयातून सायलीच्या व्यक्तिरेखेतील ठामपणा, संवेदनशीलता आणि अन्यायाविरुद्धचा संताप प्रभावीपणे व्यक्त केला आहे. मनोरंजनासोबतच स्त्रीसुरक्षा, सामाजिक जबाबदारी आणि स्त्रीच्या सन्मानाचा महत्त्वपूर्ण विषय मांडणारा हा प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर निश्चितच ठसा उमटवणारा आहे. तेव्हा सायलीच्या या लढ्याचा निकाल काय लागणार? या मुलींना न्याय मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जि…