no images were found
स्कोडा ऑटो इंडियाचे ३५० कस्टमर टचपॉइंट्सचे लक्ष्य
पूर्ण; १९३ शहरांमध्ये विस्तार
कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने देशभरातील १९३ शहरांमध्ये ३५० हून अधिक कस्टमर टचपॉइंट्स सुरू करत नेटवर्क विस्ताराचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ३० ऑक्टोबर रोजी इंफाळ येथे ३५० व्या टचपॉइंटचे उद्घाटन करून कंपनीने मणिपूरमध्येही प्रवेश केला.
२०२६ मध्ये कंपनीने बालासोर, बारामती, बिकानेर, इंफाळ, जोरहाट, वसई यांसह ११ नवीन शहरांमध्ये आपले नेटवर्क विस्तारले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कंपनीच्या एकूण विक्रीत नवीन आउटलेट्सचा वाटा २५ टक्क्यांहून अधिक राहिला.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी या विस्ताराबद्दल समाधान व्यक्त करताना, ग्राहकांना विक्री आणि विक्रीनंतरच्या सेवांमध्ये उत्तम अनुभव देणे हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कंपनीकडून चार वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी, रोडसाइड असिस्टन्स, मोफत सर्व्हिस लेबर आणि स्कोडा एक्सप्रेस केअर यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. देशभरात ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचण्याच्या उद्देशाने कंपनी नेटवर्क विस्तारावर भर देत आहे.