no images were found
अंबुजा सिमेंट्सने सुमारे 30 MTPA क्षमतेच्या विस्तारासह विकासाच्या पुढील टप्प्याची तयारी केली
अहमदाबाद, : अदानी समूहाचा भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या बांधकाम साहित्य समाधान पुरवठादारांपैकी एक असलेल्या अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने आपल्या विस्ताराच्या पुढील टप्प्याची निश्चित आखणी केली आहे. याअंतर्गत देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे 30 MTPA सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विस्तारामुळे कंपनीचे उत्पादन आणि वितरण जाळे पूर्व, पश्चिम आणि उत्तर भारतात अधिक मजबूत होणार आहे. सध्या कंपनीची देशभरातील 24 एकात्मिक उत्पादन प्रकल्प (Integrated Plants) आणि 24 ग्राइंडिंग युनिट्सच्या माध्यमातून एकूण 113.5 MTPA सिमेंट उत्पादन क्षमता आहे.
या विस्तारामध्ये पश्चिम विभागात सुमारे 15.5 MTPA, पूर्व विभागात 11.6 MTPA आणि उत्तर विभागात 2.9 MTPA नवीन ग्राइंडिंग क्षमता उभारण्याचा समावेश आहे.पूर्व विभागात आसाममधील रंगिया (2.9 MTPA) आणि होजाई (2.9 MTPA), झारखंडमधील गोड्डा (2.9 MTPA) आणि बिहारमधील मुझफ्फरपूर (2.9 MTPA) येथे नवीन क्षमता उभारण्यात येणार आहे.पश्चिम विभागात गुजरातमधील मुंद्रा (2.9 MTPA) आणि हजीरा (2.9 MTPA), तर महाराष्ट्रातील रायगड (2.9 MTPA), कल्याण (2.9 MTPA), डहाणू (0.7 MTPA) आणि अमरावती (2.9 MTPA) येथे नवीन ग्राइंडिंग क्षमता विकसित करण्यात येणार आहे.उत्तर विभागात उत्तर प्रदेशातील दादरी लाईन 2 (2.9 MTPA) येथे नवीन क्षमता उभारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत क्लिंकर उत्पादन क्षमतेतही वाढ करण्यात येणार आहे. पूर्व विभागात आसाममधील उमरांगसो येथे 4 MTPA, पश्चिम विभागात मराठा येथे 4 MTPA आणि मुंद्रा येथे 2.3 MTPA क्लिंकर क्षमता विकसित केली जाणार आहे. विस्तारित ग्राइंडिंग क्षमतेला आवश्यक असलेला क्लिंकर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी या प्रकल्पांमुळे कंपनीचे अपस्ट्रीम उत्पादन जाळे अधिक मजबूत होणार आहे.
अदानी समूहाच्या सिमेंट व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. विनोद बाहेती म्हणाले,“आमच्या विस्ताराच्या पुढील टप्प्याचा भर हा गुणवत्तापूर्ण विकासावर आणि अधिक संतुलित उत्पादन जाळे निर्माण करण्यावर आहे. क्लिंकर आणि ग्राइंडिंग क्षमतेमधील समन्वय अधिक मजबूत करून तसेच उच्च विकास क्षमता असलेल्या प्रमुख बाजारपेठांच्या जवळ उत्पादन क्षमता वाढवून आम्ही आमच्या उत्पादन जाळ्यात अधिक लवचिकता निर्माण करत आहोत.
व्यवसायाचा विस्तार करताना बाजारपेठेतील पोहोच, लॉजिस्टिक्स आणि खर्चातील कार्यक्षमता यांचा समन्वय साधण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे क्षमतेतील प्रत्येक वाढ एकूण व्यवसायाची स्पर्धात्मकता अधिक मजबूत करेल. या बाजारपेठांमध्ये आमची पुरवठा साखळी परिसंस्था सक्षम असून ब्रँड इक्विटी आणि प्रीमियम सिमेंटचा बाजारातील वाटा अधिक मजबूत झाला आहे. आमचा हा विकासात्मक विस्तार मूल्याधारित धोरणात्मक विकासाला पूरक ठरेल.”
या विस्ताराच्या टप्प्यासह अतिरिक्त डिबॉटलनेकिंग उपक्रमांमुळे आर्थिक वर्ष 2030 पर्यंत कंपनीची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 155 MTPA पर्यंत पोहोचणार आहे. या संपूर्ण विकास कार्यक्रमासाठी सुमारे 14,500 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक (Capex) करण्यात येणार आहे.
बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याबरोबरच या नवीन क्षमतांमुळे उत्पादनातील अधिक कार्यक्षमतेच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. बाजारपेठांच्या जवळ उत्पादन केंद्रे उभारल्यामुळे वाहतुकीचे अंतर कमी होईल आणि परिणामी लॉजिस्टिक्स खर्चातही बचत होईल. एकूणच, या उपक्रमांमुळे आर्थिक वर्ष 2028 पर्यंत प्रति मेट्रिक टन 4,000 रुपयांचा उत्पादन खर्च साध्य करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुलभ होणार आहे.
नवीन विस्तार कार्यक्रम हा सध्या अंमलबजावणी सुरू असलेल्या क्षमता विस्तार प्रकल्पांवर आधारित आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत (H1 FY27) कंपनीने एकूण 4.6 MTPA क्षमतेची भर घातली आहे. यामध्ये गुजरातमधील दहेज येथे 1.2 MTPA क्षमतेचा ब्राउनफिल्ड विस्तार, उत्तर प्रदेशातील नवीन 2.4 MTPA क्षमतेचे सलई बनवा ग्राइंडिंग युनिट आणि महाराष्ट्रातील कलंबोली येथे 1.0 MTPA क्षमतेचा ब्राउनफिल्ड विस्तार यांचा समावेश आहे. यामुळे कंपनीची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 113.5 MTPA झाली आहे.
याशिवाय, नजीकच्या काळातील विस्तार प्रकल्पांमुळे या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. पंजाबमधील बठिंडा ग्राइंडिंग युनिट (GU) येथे 1.2 MTPA आणि राजस्थानमधील जोधपूर पेन्ना इंटिग्रेटेड युनिट (IU) येथे 2 MTPA अशा एकूण 3.2 MTPA क्षमतेच्या प्रकल्पांचे स्थिरीकरण पूर्ण झाले असून आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत (H2 FY27) त्यांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, बिहारमधील वारिसलीगंज ग्राइंडिंग युनिट (GU) येथे 2.4 MTPA क्षमतेचा प्रकल्प आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत कार्यान्वित होणार आहे. मार्च 2027 अखेरपर्यंत कंपनीची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 119 MTPA पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंट्सने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत एकूण 11 क्षमता विस्तार प्रकल्प पूर्ण केले आहेत. या प्रकल्पांमधून कंपनीच्या सिमेंट उत्पादन क्षमतेत 16.3 MTPA आणि क्लिंकर उत्पादन क्षमतेत 9.0 MTPA ची वाढ झाली आहे.नवीन 30 MTPA क्षमतेचा विस्तार कार्यक्रम हा कंपनीच्या या विकास प्रवासातील पुढील महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे कंपनीचे देशव्यापी उत्पादन जाळे अधिक व्यापक, मजबूत आणि कार्यक्षम होणार आहे. सध्या कंपनीच्या या जाळ्यामध्ये 25 एकात्मिक उत्पादन युनिट्स (IU), 37 ग्राइंडिंग युनिट्स (GU) आणि 3 क्लिंकर युनिट्स (CU) यांचा समावेश आहे.