Home Uncategorized आयआयएससी चे संचालक प्रा. रंगराजन यांनी अदाणी विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात एआय  च्या संधी आणि धोक्यांवर टाकला प्रकाश; ३७४ विद्यार्थी पदवीधर

आयआयएससी चे संचालक प्रा. रंगराजन यांनी अदाणी विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात एआय  च्या संधी आणि धोक्यांवर टाकला प्रकाश; ३७४ विद्यार्थी पदवीधर

3 second read
0
0
9

no images were found

आयआयएससी चे संचालक प्रा. रंगराजन यांनी अदाणी विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात एआय  च्या संधी आणि धोक्यांवर टाकला प्रकाश; ३७४ विद्यार्थी पदवीधर

संपादकीय सारांश

  • अदाणी विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात शैक्षणिक वर्ष २०२६ च्या ३७४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी दहा विद्यार्थ्यांना पदके देण्यात आली. यामध्ये पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश होता.
  • भारतीय विज्ञान संस्थेचे (आयआयएससी) संचालक प्रा. गोविंदन रंगराजन हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या भाषणात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय ) शिक्षण, संशोधन आणि समाजावर होणारा परिणाम यांचा ऊहापोह केला. तसेच सत्याचा ऱ्हास आणि मानवी नातेसंबंध कमकुवत होण्याबाबतच्या चिंताही व्यक्त केल्या.
  • अदाणी विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संशोधन आणि इनक्युबेशनच्या माध्यमातून भारताच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील यशाचा पुढील टप्पा गाठण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचणारी उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला.

अहमदाबाद, : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात नव्या संधी निर्माण करत आहे; मात्र तिच्या वाढत्या प्रभावामुळे सत्य, विश्वास आणि मानवी नातेसंबंधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, असे भारतीय विज्ञान संस्थेचे (आयआयएससी) संचालक प्रा. गोविंदन रंगराजन यांनी शनिवारी अहमदाबाद येथे अदाणी विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात सांगितले.

अदाणी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६ च्या ३७४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी दहा विद्यार्थ्यांना पदके देण्यात आली. यामध्ये पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश होता.

अदाणी विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “प्रा. रंगराजन यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तिमत्त्वाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभणे हे आमचे भाग्य आहे. गणित, संशोधन आणि शैक्षणिक नेतृत्वाच्या क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आमच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी तसेच अदाणी विद्यापीठाला एक अग्रगण्य संशोधनाभिमुख विद्यापीठ बनविण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

प्रा. रंगराजन म्हणाले, “एआय  मुळे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रचंड शक्यता निर्माण झाल्या आहेत. गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यास आणि वैज्ञानिक शोधांचा वेग वाढविण्यास एआय  मदत करू शकते. मात्र, त्याच्या परिणामांबाबतही आपण सजग असणे आवश्यक आहे. जेव्हा प्रतिमा, व्हिडिओ आणि माहिती इतक्या विश्वासार्ह पद्धतीने निर्माण करता येते, तेव्हा खरे काय आहे हे आपण कसे ओळखणार? तसेच तंत्रज्ञानामुळे आपण डिजिटल माध्यमातून एकमेकांच्या अधिक जवळ येत असताना, प्रत्यक्षात एकमेकांपासून अधिक दूर तर जात नाही ना? एआय  कडून मिळणाऱ्या संधींचा आपण स्वीकार केला पाहिजे; मात्र त्याचबरोबर आपण काय गमावू शकतो, याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे.”

उद्योगक्षेत्र आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील संबंधांबाबत बोलताना डॉ. अदाणी म्हणाल्या, “उद्योगक्षेत्र विद्यापीठाला केवळ काय अभ्यास करायचा हे सांगेल, एवढाच यामागील उद्देश नाही. तर प्रत्यक्ष जगातील आव्हानात्मक परिस्थितींचा अनुभव घेतल्यामुळे असे काही प्रश्न समोर येऊ शकतात, ज्यांची मांडणी उद्योगक्षेत्र किंवा शैक्षणिक संस्था यांपैकी कोणालाही स्वतंत्रपणे करता आली नसती.”

त्या पुढे म्हणाल्या, “भारताने पायाभूत सुविधांच्या उभारणीत उल्लेखनीय प्रमाणात प्रगती केली आहे. आता आपल्याला नावीन्यपूर्ण संशोधन आणि इनक्युबेशन मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे.” समाजातील सर्वाधिक वंचित घटकांपर्यंत पोहोचू शकतील अशा नावीन्यपूर्ण संकल्पना आणि उपाययोजनांवर काम करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करताना प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) धवल पुरा यांनी प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी आणि उद्योगक्षेत्रातील भागीदारांच्या योगदानाचा गौरव केला. विद्यापीठाचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी, संशोधन परिसंस्था विकसित करण्यासाठी तसेच उद्योगक्षेत्र आणि समाजाशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. भारताच्या विकास आणि राष्ट्रउभारणीत योगदान देणारी बहुविद्याशाखीय शिक्षण व संशोधन संस्था म्हणून विकसित होणे, हे विद्यापीठाचे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२०२२ मध्ये स्थापन झालेले अदाणी विद्यापीठ उद्योगक्षेत्राशी सुसंगत शिक्षण, प्रात्यक्षिकाधारित अध्ययन आणि संशोधन यांवर लक्ष केंद्रित करते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

वाराणसी येथील परिसंवादात डॉ. प्रीती अदाणी यांनी आधुनिक आव्हानांवर मात करण्यासाठी प्राचीन ज्ञानाची उपयुक्तता अधोरेखित केली

वाराणसी येथील परिसंवादात डॉ. प्रीती अदाणी यांनी आधुनिक आव्हानांवर मात करण्यासाठी प्राचीन ज…