Home सामाजिक सिट्रॉनकडून वर्षअखेरीस २०० टचपॉइंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी नेटवर्क विस्तार कार्यक्रम सुरू

सिट्रॉनकडून वर्षअखेरीस २०० टचपॉइंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी नेटवर्क विस्तार कार्यक्रम सुरू

51 second read
0
0
87

no images were found

सिट्रॉनकडून वर्षअखेरीस २०० टचपॉइंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी नेटवर्क विस्तार कार्यक्रम सुरू

 

रत्नागिरी : सिट्रॉन या अग्रगण्य फ्रेंच ऑटो निर्मात्या ब्रॅंडने २०२४ च्या अखेरपर्यंत २०० सेल्स आणि सर्व्हिस टचपॉइंट्स स्थापन करण्याच्या उद्दिष्टाने नेटवर्क विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरुवात केली आहे. हा परिवर्तनात्मक उपक्रम देशभरातील वैविध्यपूर्ण आणि वाढत जाणाऱ्या ग्राहकवर्गाला सिट्रॉन ब्रँडचा अतुलनीय अनुभव प्रदान करण्यासाठीच्या ब्रँडच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो.

शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये नवीन डीलरशिप्सची भर पडल्याने सिट्रोन्सचे भारतातील फूटप्रिंट्स सध्याच्या ५८ वरून वाढून २००पेक्षा जास्त होतील, ही नेटवर्कमधील ४०० टक्के वाढ असेल. अतिशय बारकाईने तयार केलेल्या या विस्तार योजनेचे उद्दिष्ट ग्राहकांमध्ये सिट्रॉनची मजबूत उपस्थिती निर्माण करणे आणि विविध बाजार श्रेणींसाठी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण स्मार्ट रिटेल फॉरमॅटसह सिट्रॉन ब्रँडचा अतुलनीय अनुभव प्रदान करणे हे आहे.

नेटवर्क विस्ताराबद्दल बोलताना सिट्रॉन इंडियाचे ब्रँड डायरेक्टर शिशिर मिश्रा म्हणाले, “आम्ही ग्राहकांना सिट्रॉन प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा आणि आमच्या उत्पादनांची क्षमता टियर वन /टियर  टू  शहरांच्या पलीकडे वाढवण्याचा विचार करत आहोत. आमचे नवे लक्ष्य टियर थ्री आणि अगदी टियर फोर मार्केट्सपर्यंत विस्तार करण्याचे आहे, ज्यांची टियर वन  आणि टियर टू शहरांच्या जवळची आणि त्यांच्या लक्षणीय वाढीच्या संभाव्यतेला लक्षात घेऊन धोरणात्मकरित्या निवड करण्यात आली आहे. या बाजारपेठांमध्ये दर्जेदार उत्पादने आणि सेवांच्या वाढीव सुलभतेसाठी उत्सुक असलेला वाढत्या ग्राहकवर्ग उपलब्ध आहे. या प्रदेशांमध्ये गुंतवणूक करून केवळ उदयोन्मुख संधी प्राप्त करण्याचे नव्हे, तर विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये समृद्धी आणि सर्वसमावेशकता वाढवण्याचे तसेच लहान शहरी केंद्रांच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देण्याचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले आहे.”

या वर्षाच्या सुरुवातीला स्टेलांटिसने तिच्या सिट्रॉन ब्रँड अंतर्गत अतिरिक्त रु.२,००० कोटींच्या गुंतवणुकीसह भारताप्रती आपली वचनबद्धता अधिक बळकट केली. यातून भारतातील सिट्रॉनच्या वाढीसाठी कंपनीचे समर्पण अधोरेखित होते. सिट्रॉन त्याचा विस्तार आणि नवनवीन शोध कायम ठेवत नवे बदल घडवून आणण्याच्या आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या, त्याची उत्पादने आणि सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनात मात्र कायम कटीबद्ध आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …