no images were found
पीएनजी ज्वेलर्स तर्फे सप्तम कलेक्शनसह दिवाळीचा उत्सव; सर्व स्टोअर्समध्ये आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स
भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित दागिन्यांच्या ब्रँड्सपैकी एक असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने दिवाळीनिमित्त विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘सप्तम कलेक्शन’. या निमित्ताने ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्क्यांपर्यंत*, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्क्यांपर्यंत* सूट मिळणार आहे. जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने घेताना कोणतीही कपात केली जाणार नाही. (हे सर्व लाभ नियम व अटींच्या अधीन आहेत).
या मोहिमेअंतर्गत पीएनजी ज्वेलर्स तर्फे ‘प्युअर प्राइस’ सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेनुसार, दागिन्यांची बुकिंग करताना बुकिंगच्या दिवशी किंवा बिलिंगच्या दिवशी लागू असलेल्या सोन्याच्या दरांपैकी जो दर कमी असेल, त्या दराचा लाभ ग्राहकांना मिळेल. त्यामुळे सोन्याच्या दरातील चढ-उतार लक्षात घेऊन ग्राहकांना खरेदीचे नियोजन करता येईल. या ऑफर्स पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व स्टोअर्समध्ये १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत* उपलब्ध असतील.
या मोहिमेचे प्रमुख आकर्षण असलेले ‘सप्तम कलेक्शन’ हे दिवाळीच्या उत्सवाशी निगडित सात भावनांपासून प्रेरित आहे. या कलेक्शनमध्ये पारंपरिक अँटिक गोल्ड आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे. नेकलेस, इअरिंग्स , अंगठ्या आणि ब्रेसलेट्स अशा विविध प्रकारांतील दागिने यामध्ये उपलब्ध आहेत. या कलेक्शनमध्ये पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक शैलीचा मिलाफ साधणाऱ्या, तसेच दैनंदिन वापरासाठीही सहज परिधान करता येतील अशा आकर्षक डिझाइन्स सादर करण्यात आल्या आहेत.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “दिवाळी हा भारतात सोन्याच्या खरेदीसाठी सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे.या खरेदीला सांस्कृतिक महत्त्व आहेच, शिवाय गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही पहिले जाते. अलीकडे सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर ग्राहकांमध्ये खरेदीबाबत उत्साह दिसून येत आहे. विशेषतः सणासुदीच्या आणि आगामी लग्नसराईच्या खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत. सप्तम कलेक्शनच्या माध्यमातून आम्ही दिवाळीशी निगडित भावनांना आकर्षक दागिन्यांच्या डिझाइन्समधून साकारले आहे. मेकिंग चार्जेसवरील विशेष सवलती आणि जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने घेताना कोणतीही कपात न करण्याच्या सुविधेमुळे ग्राहकांना आपल्या बजेटनुसार जुन्या दागिन्यांच्या जागी नवीन डिझाइन्स निवडता येतील. नवनवीन डिझाइन्स आणि पिढ्यान्पिढ्या आमच्याशी जोडलेल्या कुटुंबांचा विश्वास यांच्या बळावर आम्ही आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज आहोत.”