Home राजकीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

1 second read
0
0
8

no images were found

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर (प्रतिनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी भाजप कार्यालय येथे भाजपा महिला मोर्चातर्फे आयोजित कृषी माऊली सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी टेरेस गार्डन तज्ज्ञ तृप्ती देशपांडे या प्रमुख वक्त्या होत्या. प्रदेश सचिव स्वाती पाटील, जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते, मेघाराणी जाधव, अश्वीनी कबुडगे, गायत्री राऊत, सुशिला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शौमिका महाडीक म्हणाल्या, आज प्रत्येक महिला काही ना काही कारणाने शेतीशी निगडीत आहेत. ग्रामिण भागात दुध डेअरीला घालणे, गुरांना चारा देणे, लागवड, पासून ते भाजीविक्रीचे काम महिला करतात. शेतकरी महिला प्रमाणपत्रामुळे या महिलांना कर्ज तसेच शासन योजनांचा लाभ मिळेल. राज्यभरातील हजारो महिला आता खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणून ओळख सांगतील.बदलत्या काळात घरच्या घरी, परसबागेत शेती शिकली पाहीजे त्यामुळेच गच्चीवरील शेती-टेरेस गार्डन संकल्पना यशस्वी होत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील असा विश्वास यावेळी महाडिक यांनी व्यक्त केला.

तृप्ती देशपांडे यांनी विषमुक्त शेती, गच्चीवरील शेतीतून काय पिकवता येते याबाबत मार्गदर्शन केले.देशी बियाण्यांचे जतन करणे आता काळाची गरज बनली आहे.त्यामुळे प्रत्येक महिलेने आपली बीज बँक बनवली पाहिजे असे आवाहन यावेळी देशपांडे यांनी केले.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १५० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कृषी साहीत्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका नेहा तेंडुलकर, राजनंदा महाडीक, बानु नदाफ, अर्चना कोराणे, पुर्वा राणे, दिपा ठाणेकर, पल्लवी देसाई, श्रद्धा जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…