Home स्पोर्ट्स शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

0 second read
0
0
5

no images were found

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते एक लाख एक हजार रुपयांचे बक्षीस; वेदांत गोविंदाने फोडली दहीहंडी

कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकासाच्या भगव्या दहीहंडीचा उत्साहात सोहळा पार पडला. शिरोळ येथील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. मंडळाला आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते एक लाख एक हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. मंडळातील गोविंदा वेदांत याने दहीहंडी फोडत उपस्थितांची दाद मिळवली.

दहीहंडी सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि गोविंदा पथकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे आणि ‘शिवसेना’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सोहळ्यात चांगलाच रंग भरला.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूरकरांच्या पाठीशी राजेश क्षीरसागर खंबीरपणे उभा आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती कामे मार्गी लावण्यासाठी आपला पाठपुरावा कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून एकजूट, संघटनशक्ती आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणारा सण आहे. गोविंदांनी एकमेकांच्या साथीने मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडावी लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या आणि शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गोविंदांनी उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थितांनी जल्लोष केला. विजेत्या मंडळाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा पथकांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.          &nb…