Home स्पोर्ट्स तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

1 min read
0
0
6

no images were found

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.                                                                                            कोल्हापूर (प्रतिनिधी ) : आकर्षक विद्युत रोषणाई, शिगेला पोहोचलेला गोविंदांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा जल्लोष, संगीताच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, उपस्थितांची हुरहुर, उत्कंठा अशा उत्साही व जल्लोषी वातावरणात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप आयोजित युवाशक्ती दहीहंडी सोहळा दसरा चौक मैदानात शनिवारी पार पडला.                                                                      तासगाव (जि. सांगली) येथील शिवनेरी गोविंदा पथकाने श्वास रोखायला लावत नियोजनबद्ध ८ थर रचून ४० फूट उंचीवरील दहीहंडी फोडून युवाशक्तीच्या दहीहंडीवर नाव कोरून उपस्थितांची वाहवा मिळविली.

        या दहीहंडीचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सायंकाळी उद्‌घाटन झाले. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर अक्षय जरग, माजी खासदार संजय मडलिक, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, स्वरूप महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, आदिल फरास, अभिजित खतकर, गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे, चेतन नरके, वैभव माने, प्रशांत पोकळे, प्रकाश पोकळे, आलोक बन्सल, ऋत्विक बन्सल, कृष्णा बन्सल, राजू माने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

  सायंकाळी सहा वाजता दहीहंडी सोहळा सुरू झाला. सार्थक क्रिएशन ग्रुपच्या कलाकांरानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. स्वराज्य ढोल पथक, सोलापूरच्या लेझीम पथकाने प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेसाठी आठ संघ सहभागी झाले होते. तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने पाच थर रचून सलामी दिली. यानंतर सोडत काढून दहीहंडीचे थर लावणारे अनुक्रमाने आठ संघ ठरविले गेले.

        ५० फुटांवरून दहीहंडी ४० फुटांवर खाली घेण्यात आली. पहिल्या फेरीत एस.पी. बॉईज गोडीविहीर संघाला संधी मिळाली; पण हा संघ उपस्थित न राहिल्याने कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाला संधी मिळाली. त्यांनी ७ थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाने देखील ७ थरांचा मनोरा उभा केला; पण दहीहंडीपर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. ८ वाजून ५२ व्या मिनिटाला तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने ८ थर रचून ४० फूट उंचीवरील दहीहंडी महिला गोविंदा ज्योती तांबे हिने फोडून उपस्थितांची वाहवा मिळविली. या गोविंदा पथकाला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तीन लाखांचे बक्षीस देण्यात आले. उर्वरित संघांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून उत्तम पाटील, इंद्रजित जाधव, डॉ. राजेंद्र बनसोडे, विजय टिपुगडे, सागर बगाडे, विनायक सुतार, अनंत यादव यांनी काम पहिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली : आमदार राजेश क्षीरसागर य…