Home शैक्षणिक दूरशिक्षण केंद्रामार्फत एम.बी.ए. फेर प्रवेश परीक्षेचे आयोजन

दूरशिक्षण केंद्रामार्फत एम.बी.ए. फेर प्रवेश परीक्षेचे आयोजन

8 second read
0
0
51

no images were found

दूरशिक्षण केंद्रामार्फत एम.बी.ए. फेर प्रवेश परीक्षेचे आयोजन

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-

२६ च्या एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) या अभ्यासक्रमासाठी रिक्त जागाकरिता फेर प्रवेश परीक्षेचे आयोजन केलेअसल्याची माहिती प्र. संचालक डॉ. के.बी.पाटील यांनी दिली.

डॉ.पाटील म्हणाले की, एम. बी. ए. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीयतंत्रज्ञान शिक्षण परिषद यांची मान्यता आहे.त्यामुळे प्रवेश इच्छुकांना मार्केटिंग, मानवी संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशनआणि प्रोडक्टशन व्यवस्थापन तसेच वित्तीय व्यवस्थापन या विषयातून एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. पदवी परीक्षेत विद्यार्थ्यास खुल्या प्रवर्गातून ५०% आणि आरक्षित प्रवर्गातून ४५% गुण असल्यास एम.बी.ए. (डिस्टन्स) प्रवेशासाठी पात्र होता येईल. प्रवेश इच्छुक विद्यार्थी,नोकरदार, गृहिणी, उद्योजक, व्यावसायिक,

प्रोफेशनल आदींना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येवू शकतो.

ज्यांना एम.बी.ए. साठी प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांनी सोमवार दि.०७ जुलै २०२५ पर्यंत प्रवेश परीक्षा अर्ज https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंकवर भरावेत व रविवार दि.१३ जुलै

२०२५ रोजी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये प्रवेश परीक्षा होईल. तसेच ज्यांनी MHT-CET /ATMA CET

दिली असेल त्यांना एम.बी.ए. (डिस्टन्स) साठी थेट प्रवेश घेता येईल. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या

एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थांनी नाव नोंदणी करावी.असे आवाहन प्र.संचालक

डॉ.के.बी.पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…