Home शैक्षणिक महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार –  अमोल येडगे

महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार –  अमोल येडगे

16 second read
0
0
31

no images were found

महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार –  अमोल येडगे

कोल्हापूर  : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकसभा निवडणूकीच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयास भेट दिली. महाराष्ट्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत घेतल्या जात असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात त्यांनी ही भेट दिली. यावेळी त्यांनी इ.3 री ते ७ वी च्या वर्गांना भेटी देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. याठिकाणी शाळेने परीक्षेसाठी केलेले नियोजन, बैठक व्यवस्था, विद्यार्थी उपस्थिती व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्न पत्रिकांची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी करुन

            जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिका टेंबलाईवाडी विद्यालयातील वर्गामध्ये फिरून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थांच्या आवडी निवडी, सुट्टीतील नियोजन, मामाचे गांव अशा विषयावर मुलांशी मुरब्बी शिक्षकाप्रमाणे मोकळेपणाने संवाद साधला. त्याचबरोबर मुलांनी सुट्टीचा उपयोग पोहायला शिकणे, सायकल शिकणे, वेगवेगळी पुस्तकं वाचण्यासाठी करावा व करीयर घडवण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करावेत असा मोलाचा सल्लाही विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. यानंतर टेंबलाईवाडी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश, शाळेची वाढलेली पटसंख्या, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी व शाळेतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेऊन सर्व स्टाफचे त्यांनी कौतूक केले. तसेच शाळेच्या भविष्यातील वाटचालीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद निर्माण झाला होता.

            यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव, पर्यवेक्षक विजय माळी, महापालिका टेंबलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, शाळेतील सर्व शिक्षक, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…