no images were found
पोकलॅण्ड मशीनव्दारे आजअखेर 324 डंपर गाळ उठाव
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे काम सुरु केले आहे. यामध्ये पोकलॅण्ड मशीनद्वारे आजअखेर 324 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये गाडीअड्डा ते लक्ष्मीपूरी, यादवनगर ते हुतात्मा पार्क येथून मुख्य नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. तर यादवनगर ते हुतात्मा पार्क नाल्याचे सफाईचे काम पुर्ण झाले आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले रुग्णालय मागील बाजू ते रेणूका मंदीर व गाडी अड्डा ते रिलायन्स मॉल मागील बाजूस पोकलॅण्ड मशीनद्वारे नाला सफाईचे काम सुरु आहे. आज सकाळी 10 वाजता अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी गाडी अड्डा व सावित्रीबाई फुले रुग्णालय मागील बाजूस चालू असलेल्या नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी नाले सफाई योग्य रित्या करुन गाळ लवकरात लवकर उठाव करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक व किटक नाशक अधिकारी यांना दिल्या.
आरोग्य विभागामार्फत शहरातील मुख्य 13 नाल्यांची महानगरपालिकेच्या 2 पोकलॅण्ड मशीनद्वारे सफाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर 2 जे.सी.बी मशीनव्दारे 206 नाल्यांपैकी शहरातील मुक्त्त सैनिक वसाहत, कदमवाडी, कात्यानी कॉम्प्लेक्स, राजारामपूरी 1 ली गल्ली अशा 38 ठिकाणी नाले सफाईचे काम करण्यात आले आहे. तर मनुष्यबळाव्दारे 476 नाल्यापैकी 160 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. यामध्ये कसबा बावडा पुर्व, भोसलेवाडी, कदमवाडी, महाडीक वसाहत, सदरबाजार, मुक्त सैनिक वसाहत, रुईकर कॉलनी, साईक्स एक्सटेशन, राजारामपूरी 1 ते 5 गल्ली, वर्षा नगर, राजेंद्रनगर, सिध्दाळा गार्डन, तटाकडील तालीम, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहत, साळोंखेनगर, शायकीय मध्यवर्ती कारागृह परिसर, रायगड कॉलनी- जरगनगर, सुर्वेनगर, तुळजाभवानी कॉलनी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबानाना जाधव पार्क अशा 26 प्रभागातील चॅनेलची स्वच्छता करण्यात आलेली आहे. शहरातील उर्वरीत सर्व नालेसफाईचे कामकाज दि.15 मे 2024 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.