Home Video जर्मनीत डीकेटीईचे नविन कार्यालय सुरु -आंतरराष्ट्रीय शैक्षणिक विस्ताराला नवी दिशा

जर्मनीत डीकेटीईचे नविन कार्यालय सुरु -आंतरराष्ट्रीय शैक्षणिक विस्ताराला नवी दिशा

11 second read
0
0
16

no images were found

जर्मनीत डीकेटीईचे नविन कार्यालय सुरु -आंतरराष्ट्रीय शैक्षणिक विस्ताराला नवी दिशा
इचलकरंजी :- जागतिक शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या दिशेने डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयुटने आणखी एक महत्वपूर्ण पाउल टाकले आहे. जर्मनी येथे संस्थेच्या नविन कार्यालयाचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या शुभमुहर्तावर ऑनलाईन पध्दतीने उत्साहात संपन्न झाला. या कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय विस्तारच्या नियोजनासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक रवी आवाडे व उपसंचालक डॉ यु.जे. पाटील यांनी नुकतीच जर्मनीला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी तेथील शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या विविध संधीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षण, इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, तसेच प्राध्यापकांसाठी संशोधन व तंत्रज्ञान देवाणघेवाणीचे व्यासपीठ निर्माण करणे या उदेशाने या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. या भेटीतून मिळालेल्या अनुभव व सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर जर्मनीमध्ये संस्थेचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
डीकेटीईने गेल्या चार दशकांहून अधिक काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण,संशोधन,उद्योगाभिमूखम अभ्यासक्रम आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जर्मनीतील नवीन कार्यालयामुळे युरोपमधील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राशी संस्थेचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त शैक्षणिक उपक्रम आणि उद्योग सहकार्याला नवी चालना मिळणार आहे.
हे कार्यालय केवळ संस्थेच्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीचे प्रतीक नसून भारतीय शिक्षण आणि जागतिक संधी यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविणे आणि त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या वाटा खुल्या करणे, या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल यावेळी माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांनी गौरवउद्गार काढले.
सदर कार्यक्रमास डीकेटीईचे मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, ट्रस्टी एस.डी.पाटील,अनिल कुडचे,शेखर शहा,रेवती आवाडे,संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ यु.जे.पाटील यांच्यासवे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न नाथा…