Home संस्कृतिक हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन…!

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन…!

0 second read
0
0
16

no images were found

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन…!

‘अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहे’च्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणला

कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी ‘अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहे’, अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेला लढा, हिंदुत्वाचा विचार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी उभारलेला संघर्ष आजही प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रावर अमीट छाप उमटवली आहे. त्यांनी शिवसैनिकांमध्ये निर्माण केलेली संघर्षाची जिद्द, संघटनशक्ती आणि जनसेवेची भावना आजही शिवसेनेच्या कार्याला दिशा देणारी आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार अखंडपणे पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण समिती सभापती शीला सोनुले, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेवक स्वरूप कदम, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा भोर, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उदय भोसले, दीपक चव्हाण, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, माजी नगरसेवक राजू हुंबे, सुनिल जाधव, कमलाकर जगदाळे, निलेश हंकारे, अंकुश निपाणीकर, सुरेश माने, देवेंद्र खराडे, राजू पवार, योगेश चौगुले, शुभम शिंदे, कपिल सरनाईक, विनायक जाधव, मंदार पाटील, अमोल बुद्ढे, गजानन भुर्के, सौरभ कुलकर्णी, अमोल नवले यांच्यासह शिवसेना, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न नाथा…